मुनगंटीवार, तेंडूलकर, धोनी, कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:15 IST2018-10-21T00:12:31+5:302018-10-21T00:15:09+5:30
वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुनगंटीवार, तेंडूलकर, धोनी, कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मुबंईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील रंगस्वर सभागृहात ते बोलत होते.
अश्वमेघ फाऊंडेशन मुंबई आणि सुनील वॅक्स म्युझियम लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्या मेणाच्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा आठवले यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी पार पडला.
यााप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार, आ. योगेश टिळेकर, अमोल जाधव, सुभाषकुमार उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. आठवले म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ असून त्याला अनेक पैलू आहेत. राजकारणापलिकडेही जाऊन त्यांनी आपल्या कर्तुत्वाची अमिट छाप निर्माण केली असून राज्याला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यात त्यांनी सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे.
या वसुंधरेचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली वृक्षलागवड मोहीम जगभरासाठी आदर्शवंत चळवळ बनली आहे. सुनील कंडलूर या कलाकाराने हे पुतळे बनविले.