शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 10, 2014 22:41 IST

राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कक्षाधिकाऱ्यांच्या पत्राला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. बदर

चंद्रपूर : राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कक्षाधिकाऱ्यांच्या पत्राला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. बदर यांनी निकाली काढली आहे. चार वर्षापूर्वी राज्यातील मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांची तपासणी केली होती. त्यानंतर तपासणी अहवाल प्रसिद्ध केला. मात्र, नवीन प्रस्ताव, दर्जा वाढ व अनुदान वितरणाबात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. राज्यातील ५ हजार ७0१ ग्रंथालयांना एप्रिल २0१२ ऐवजी जून २0१४ पासून वाढीव अनुदान देण्यात येईल, या आशयाचे कक्ष अधिकाऱ्यांनी २५ जुलैला पत्र काढले. याविरोधात औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव गुलाबराव मगर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. कक्ष अधिकाऱ्यांच्या पत्रास मान्यता नसल्याचे शासनाने खंडपीठात नमूद केले. शासनाने अनुदान तत्त्वावर ग्रंथालय सुरू करण्याचे धोरण स्वीकारले आहे. राज्यात ११ हजार ५८७ मान्यता प्राप्त ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांना शासनाकडून ९0 टक्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदान देण्यापूर्वी शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त ग्रंथालयांची अचानक तपासणी केली. या तपासणीत ५ हजार ७८४ ग्रंथालय शासनाचे निकष आणि नियमानुसार कार्यरत असल्याचे आढळले. तीन महिन्यानंतर शासनाने पुन्हा उर्वरित ग्रंथालयांची फेरतपासणी केली. यात ५ हजार ७0१ ग्रंथालयांना नियमाप्रमाणे १ एप्रिल २0१२ पासून अनुदान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे शासन अनुदान देण्याचा निर्णय घेते आणि दुसरीकडे कक्ष अधिकारी शासन निर्णयाशी विसंगत पत्र काढून ग्रंथालय चळवळीला अडचणीत आणत असल्याचे नमूद करीत जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव गुलाबराव मगर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.याचिकेवर सुनावणी होत असताना महाराष्ट्र शासन आणि गं्रथालय संचालनालय यांच्या वतीने न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले. शासन निर्णयानुसार ५ हजार ७0१ ग्रंथालयांना एप्रिल २0१२ पासून अनुदान देण्यात येईल, असे त्यात नमूद केले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली. (स्थानिक प्रतिनिधी)