शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 11:12 IST

Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही

ठळक मुद्देसफारी करताना मास्क बंधनकारकमास्क नसल्यास होणार दंड

चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र जंगल सफारी करीत असताना कोविडचे नियम पाळले जात नसल्यामुळे कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरिता ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. नियम न पाळल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, एकाच कुटुंबातील किंवा सोबत प्रवास करणारे, सोबत राहणारे पर्यटकांना प्रचलित नियमानुसार सफारी करता येईल. इतरांसाठी ४ पर्यटक प्रती जिप्सी वाहन यानुसार मर्यादेत सफारी करता येणार आहे.

प्रत्येकाने मास्क लावणे व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहील. मास्कशिवाय प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार नाही. मास्क सोबत घेऊन येण्याची जबाबदारी ही संबंधित वनकर्मचारी, पर्यटक, जिप्सी चालक व मार्गदर्शक यांची राहील. कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, पाण्याच्या बॉटल्या, इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. सफारी दरम्यान सुद्धा मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

प्रवेशव्दारांवर गर्दी होऊ नये, याकरिता दोन वाहनांमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवण्यात यावे. शिवाय पर्यटकांना प्रवेश देताना वाहनांना प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधी प्रवेश व अर्धा तास आधी बाहेर निघण्याची मुभा राहणार आहे. त्यानुसार प्रवेशाकरिता स्लॉटची आखणी करण्यात येणार आहे.

प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मल स्कॅनर, इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येणार आहे. ताप-सर्दी खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पHealthआरोग्यenvironmentपर्यावरणforestजंगलtourismपर्यटनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन