शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीचा केवळ मुहूर्तच

By admin | Updated: November 14, 2016 00:50 IST

जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी सुरू केली आहे.

दोन शेतकरी आले : ८९ क्विंटल धानाची झाली खरेदीचंद्रपूर : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी मुहूर्ताला ८९.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यावेळी केवळ दोन शेतकऱ्यांना धान आणण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी खरेदी केंद्रावर फिरकलेले नाहीत.मार्केटिंग फेडरेशनतर्फे २४ आॅक्टोबर रोजी सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीड येथील सहकारी खरेदी-विक्री संस्था, कोधो येथील श्रीगुरूदेव सहकारी राईस मिल, सावली येथील विविध कार्यकारी संस्थेमध्ये धान खरेदी सुरू करण्यात आली. या पाच खरेदी केंद्रांपैकी केवळ सिंदेवाही येथील खविसंने दोन शेतकऱ्यांकडून ८९.६० क्विंटल धानाची खरेदी केली आहे. हा सर्वसाधारण दर्जाचा धान असल्याने १४७० रुपये ते १५१० रुपये यादरम्यान आधारभूत किंमत देण्यात आली. त्या दराने धान विक्री करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना १ लाख ३१ हजार २१२ रुपये अदा करण्यात आले. २४ नोव्हेंबरनंतर मार्केटिंग फेडरेशनने ७ नोव्हेंबर रोजी मूल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, व्याहाड (खु) व व्याहाड (बु.), नवरगाव येथील विविध कार्यकारी संस्था, ब्रह्मपुरी येथील खविसं, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक संघ व बरडकोनी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व धान खरेदी केंद्रावर ११ नोव्हेंबरपर्यंत धान विक्री करण्यासाठी कोणीही शेतकरी आलेला नव्हता. (प्रतिनिधी)दर्जेदार धानाला २७७५ रुपये भावधानाची वेगवेगळी प्रतवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये दर्जेदार धानाला २७७५ रुपये आधारभूत भाव देण्यात येत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात दर्जेदार धानासह सर्वसाधारण दर्जाचे धान उत्पादन होत असते. सर्वसाधारण धानाला १४७० रुपये व ‘अ’ दर्जासाठी १५१० रुपये आधारभूत किंमत देण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वसाधारण दर्जाचा धान खरेदी केंद्रावर आणण्यात येत असल्याने त्याची आधारभूत किंमतदेखील कमी आहे. आधारकार्ड व लिंकिंग बँक खाते आवश्यकखरेदी केंद्रावर धान आणताना शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी आधारकार्ड व आधार लिंक केलेले बँक खाते आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय चालू वर्षीचा सातबाराही सोबत आणायचा आहे. शेतीचा सातबारा उतारा पाहूनच धान खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रावर आणलेल्या धानाची आर्द्रता १७ टक्क्यांपेक्षा अधिक नको. त्यापेक्षा अधिक ओलावा असणारा धान आणि बुरशीयुक्त धानदेखील स्वीकारण्यात येणार नाही.आदिवासी महामंडळातर्फेही खरेदीदि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने १३ केंद्रांवर धान खरेदी सुरू केली आहे. याशिवाय आदिवासी महामंडळातर्फेदेखील धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी महामंडळाने १९ खरेदी केंद्र उघडले आहेत. खरीप हंगामाची धान खरेदी ३१ मार्च २०१७ रोजीपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीलाच धान विक्री करावी. त्यांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये. धान १७ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेले धान विक्रीसाठी आणू नये. यावर्षी परतीच्या पावसामुळे धानाचे पीक उशिरा आले आहे. सध्या धानाचे पुंजने तयार करणे सुरू आहे. १५ नोव्हेंबरनंतर धान खरेदीमध्ये वाढ होईल.-अनिल गोगीरवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, दि महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन,