डास प्रतिबंधक फवारणी करावी
जिवती : तालुक्यातील दुर्गम भागातील कोलाम पाड्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींची अर्थव्यवस्था नाजूक झाली. अशा स्थितीत ग्रामपंचायतींनी स्वबळावर डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली नाही. त्यामुळे पंचायत समितीने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
निवारा दुरुस्ती करण्याची मागणी
राजुरा : चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र असलेल्या देवघाट, बुल्हेशाह बाबा दर्गा, माथा व कुसळ येथील रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना एसटीच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते.
अंचलेश्वर वाॅर्डातील नाल्यांची स्वच्छता करा
चंद्रपूर : अंचलेश्वर वाॅर्डात विविध ठिकाणी कचरा साचला आहे. नाल्यांचा उपसाही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मनपाने स्वच्छतेची गती वाढवावी. शिवाय, रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
निधीअभावी अंतर्गत रस्ते बांधकाम ठप्प
चिमूर : तालुक्यातील सुमारे १५ गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, निधी न मिळाल्याने कामे रखडली आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये पंचायत समितीने ग्रामपंचायतला पत्र पाठवून निधी देण्याचे मान्य केले. मात्र, जिल्हा परिषदेकडून अद्याप निधी मंजूर झाला नाही.