The OBC census plates provided for the sound of Sankranti at Ballarpur | बल्लारपुरात संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या
बल्लारपुरात संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या

चंद्रपूर : देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींसाठी नमुद करायला काॅलम नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड, नॅशनल ओबीसी फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत आग्रही आहेत. अंजलीताई साळवे यांचा न्यायालयीन लढा, मिशन संसद, मिशन विधिमंडळ ठराव तसेच त्यांच्या "लढा ओबीसी जनगणना 2021 पाटी लावा" मोहीमेतील पाट्या लावा मोहीम महाराष्ट्रातील विदर्भासह इतरही भागात  जोरात सुरू आहे.

सध्या संक्रांतीसाठी सर्वत्र महिला विविध प्रकारचे वाण देण्याची प्रथा असतांना बल्लारपुरात वाणामध्ये "जनगणना 2021 मध्ये ओ बी सी (व्हीजे, एनटी,डीएनटी, एस बी सी)चा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही " अश्या आशयाच्या पाट्या वाण म्हणून देऊन सरकारने ओबोसीची जनगणना करावी असा संदेश सरकारला पोहचवून डॉ ऍड अंजली साळवे यांच्या लढ्यात सहभाग दर्शविला. 

माधुरी खुटेमाटे यांच्या पुढाकारातुन जिजाऊ ब्रिगेडच्या अॉड. प्रिती पावडे, अर्चना फरकाडे, लता भेंडारकर, मंजुषा सरोदे, सारिका पायताडे, निकीता खाडे, पौर्णिमा वैद्य या महिलांनी वाणामध्ये या ओबीसी जनगणनेच्या पाट्या वाणामध्ये दिल्या. 

जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे दिनेश पारखी यांची जनजागृती जोरात सुरू असताना अंजली साळवे यांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात घरांवर लाऊन दिसत आहे. बल्लारपुरात विवेक खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर यांच्यासारखे अनेक व्यक्ती या कार्यात लागुन आहे. महिलांनी आता वाणामध्ये ओबीसी जनगणनेच्या पाट्या द्यायला सुरूवात केल्यामुळे येत्या काळात ओबीसी जनगणनेचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे मात्र नक्की.

Web Title: The OBC census plates provided for the sound of Sankranti at Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.