ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:25+5:30

राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा फारसा लाभ होताना दिसत नाही.

For the OBC census, he is doing 'awareness' in the village | ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती

ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती

Next
ठळक मुद्दे५५ गावे घातली पालथी : ध्येयवेड्या माणसाने घेतला जनजागृतीचा वसा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : समाजात काही माणसे असे आहेत की ते स्वत:चा विचार न करता कायम समाजाचा विचार करीत असतात. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्दात्त हेतूने झपाटलेल्या एका ध्येयवेड्या माणसाने दिवसरात्र परिश्रम घेत ओबीसी जनगणनेसाठी एकाकी झुंज देत आहे.
राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना झाली नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा फारसा लाभ होताना दिसत नाही. त्यासाठी ओबीसींची जनगणना व्हावी, यासाठी दिनेश पारखी हे गावागावात जावून जनजागृती करण्याचे काम करीत आहे. त्यांनी राजुरा तालुका पूर्णत: पिंजून काढला असून आजपर्यंत त्यांनी ५५ गावे पालथी घालून नागरिकांमध्ये ओबीसी जनगणनेविषयी जनजागृती केली आहे.
भारतात १९३१ पासून ओबीसींची जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला शासनाच्या विविध योजनांमधून वगळण्यात आले आहे. हा ओबीसी समाजावर केला जाणारा अन्याय असून २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या जनगणननेत ओबीसींची जनगणना करावी, यासाठी ते आपल्या कामातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते इतर मागासवर्गीयांची (ओबीसींची) जनगणना व्हावी, यासाठी दिवसरात्र झटत आहे.
पंतप्रधान कार्यालयाला सहा हजार पोस्टकार्ड
ओबीसींची जनगणना होण्यासाठी दिनेश पारखी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला सहा हजार पोस्टकार्ड पाठविले आहेत. यासोबतच ओबीसी जनजागृती अभियान, एकदिवसीय धरणे आंदोलन, ओबीसी परिषद, ओबीसी जनगणना आंदोलन व समाज प्रबोधन करून समाजजागृतीची चळवळ अधिकच समृद्ध केली आहे. यासाठी त्यांनी आपली चळवळ अधिकच तीव्र केली असून त्यांनी आता प्रत्येक घरी जाऊन ‘ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे’ अशा आशयाचे पत्रक घरोघरी दिले आहे.

Web Title: For the OBC census, he is doing 'awareness' in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.