कोथुळणा येथे पोषण सप्ताह अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST2021-09-19T04:28:58+5:302021-09-19T04:28:58+5:30
कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातून सुपोषण रॅली काढण्यात आली. रॅलीत सुपोषणाचे नारे देण्यात आले. अंगणवाडीसेविकांनी सुपोषणावर गाणे गायन केले, ...

कोथुळणा येथे पोषण सप्ताह अभियान
कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातून सुपोषण रॅली काढण्यात आली. रॅलीत सुपोषणाचे नारे देण्यात आले. अंगणवाडीसेविकांनी सुपोषणावर गाणे गायन केले, तर प्रमुख अतिथींनी पोषणावर मार्गदर्शन केले. या पोषण अभियानाचे औचित्य साधून फळांची, भाज्यांची, पोषक पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती, तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्यांमधून पोषणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमास नागभीड पं.स.च्या उपसभापती रागिणी गुरपुडे, प.स.सदस्य अरविंद देशमुख, पर्यवेक्षिका सलामे, माजी सभापती गीता पालपणकर, सरपंच मंजुषा डाहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैशाली शिवणकर, तसेच मोहाळी सर्कलच्या सर्व अंगणवाडीसेविकांनी प्रयत्न केले. संचालन विद्या गायधने यांनी केले, तर आभार प्रणिता खोब्रागडे यांनी मानले.
180921\img-20210918-wa0027.jpg
पोषण सप्ताह अभियान कार्यक्रमास उपस्थित अतिथी