शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशीम शेतीला रोहयोची साथ

By admin | Updated: November 9, 2014 22:31 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.

पेंढरी : चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ढिवर (भोई) समाज बांधवांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजुरी मिळणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी येथे रेशीम कोसा उद्योग केंद्र असून या केंद्रातंर्गत पाथरी, गुंजेवाही, गांगलवाडी, मेंडकी पेंढरी (कोकेवाडा), मोठेगाव, सिरपूर, काजळसर, इत्यादी ठिकाणचे भोई बांधव रेशीमची लागवड करतात. परंतु त्यांच्या कोशाला साजेसा भाव मिळत नसल्याने व तसेच त्यांना भरपूर प्रमाणात वीज पुरवठा होत नसल्याने व घरची सर्व मंडळी या शेतीत व्यस्त असल्याने ही रेशीम शेती याअगोदर परवडणारी नव्हती. परंतु आता राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रेशीम उत्पादन हा शेतीशी निगडीत व्यवसाय असल्याने याला रोजगार हमी योजनेचे बळ मिळणार आहे. या अगोदर रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. या उद्योगाद्वारे रेशीम किडे सोडणे, त्याचे संगोपन करणे, झाडाची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामे केली जातात.या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांसाठी एक लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रुपये लाभार्थ्यांचा भत्ता राहणार आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरु झाली नसल्याचे कळते. परंतु या बारमाही रोजगारामुळे भोई समाज बांधवात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)