शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 5:00 AM

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तसेच शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेमध्ये  हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे प्रत्येक शाळेतील गुरुजी डाॅक्टर होणार असून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासोबतच शाळेत येताना घ्यावयाची काळजी, आदी सूचना शासनाने केल्या आहेत. 

हेल्थ क्लिनिकमध्ये काय काय राहणार- शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून ऑक्सिमिटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यावे.- विद्यार्थ्यांचे नियमित टेम्परेचर, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी सलग्न कराव्यात.   इच्छुक डाॅक्टर, पालकांची मदत घ्यावी.- आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी.- येता-जाताना मुलांचा मास्क पडला तर मुलांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी मास्कचा साठा ठेवावा.

शिक्षकांची जबाबदारी वाढणारnकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.nशाळेत आलेल्या प्रत्येक मुलांचे तापमान, ऑक्सिजन मात्रा तपासून नोंद करावी लागणार आहे.nएखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप असल्याचे लक्षात आल्यास तातडीने त्याच्या पालकांना कळवून वैद्यकीय उपचारासाठी घरी पाठवावे लागणार आहे.nकोरोना होऊन गेलेल्या मुलांशी शिक्षकांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागायचे आहे.

शिक्षक काय म्हणतात....

शाळा सुरू झाल्या आहे. याचे प्रत्येकांना समाधान आहे. शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. मात्र, सुविधा पुरविण्यासाठी शासनानेही शाळांना अनुदान देणे महत्त्वाचे आहे.-प्राचार्य नरेंद्र बोबडे, अध्यक्ष, मुख्याध्यापक असोसिएशन, चंद्रपूर 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करून वर्ग भरविले जात आहे. पालकांचेही सहकार्य लाभत आहे.-राजू साखरकर, मुख्याध्यापक, चंद्रपूर

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या