शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

कुणाचीच उपासमार होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : घरातच सुरक्षित रहा, प्रशासनाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व स्वत:च्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाºया काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य शासनाच्या निदेर्शांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या काटेकोर कामाचे कौतुक केले. मात्र एकीकडे लॉकडाऊन असताना कोणत्याच परिस्थितीत अन्नधान्याचा पुरवठा किंवा तयार अन्न पुरविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.यावेळी ५ एप्रिलनंतर आपण स्वत: वैयक्तीकरित्या ३० हजार अन्नधान्याच्या किट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा लोकांना देणार असल्याचे स्पष्ट केले.अन्य राज्यातील अनेक मजूर, कामगार रोजंदारी कर्मचारी बांधकामावर असणारे मजूर, छोट्या-मोठया उद्योगात काम करणारे मजूर, यांच्याकडे रेशन कार्ड नाही. मात्र रेशन कार्ड नाही म्हणून त्यांची उपासमार होता कामा नये, आपल्या राज्यातील अनेक ठिकाणी मजूर अडकून आहे. त्या त्या ठिकाणचे राज्यशासन त्यांची व्यवस्था करत आहेत.यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव व अन्य मंत्र्यांशी आपले बोलणे झाले आहे. अन्य राज्यातील मजूर, प्रवासी व अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची, विद्यार्थ्यांची कामगारांची, उपासमार होणार नाही. त्यांना योग्य मदत मिळेल, यासाठी यंत्रणेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाने गेल्या काही दिवसात अतिशय संयमाने काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. आतापर्यंत ६७ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला मज्जाव करणे, आवश्यक असून जनतेने या काळात गरज नसताना बाहेर पडूच नये, असे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले.शंभर नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्णजिल्ह्यात आतापर्यंत बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या शंभर नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. ५३ नागरीक अद्याप निगराणीत आहे. आतापर्यंत पाठवलेल्या सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने सुरू केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या समन्वयात सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालादेखील भेट दिली. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या असून सर्व जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी नागरिकांची उत्तम व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हस्ते मदत करावी. सर्व कृषी केंद्र व खतांचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी. शिवभोजन यंत्रणा तालुका स्तरावर सक्रीय करण्यात यावी. व्हॉट्स अ‍ॅपवरील खोटया संदेशापासून नागरिकांनी सावध रहावे, अशा सुचना ना. वडेट्टीवार यांनी यावेळी केल्या.ग्रामीण लोकप्रतिनिधींनी पुढे यावेशेतकरी, शेतमजूर, गरीब, निराश्रित, बेघर, विमनस्क अशा सगळ्या लोकांच्या रोजच्या भोजनाबाबत अधिक काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. महानगरात काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात गावागावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या परिसरात कोणी उपाशी राहणार नाही, यासाठी प्रशासनासोबत येऊन काम करावे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.शाळेच्या शुल्कासाठी सक्ती करू नयेराज्यामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोना साथीची सध्याची परिस्थिती, लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते की, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची कार्यवाही करावी, अशी माहिती राज्य शासनाने परिपत्रक जारी करून दिली आहे.आजपासून हॅलो चांदा सुरूशहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा. मालवाहतूक करणाºया वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.यंत्र खरेदीचे प्रस्ताव सादर कराआरोग्य यंत्रणेने जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले प्रशिक्षण व घेत असलेली काळजी, तसेच आशा वर्करपासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी या काळातील कर्तव्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढील अनेक दिवस हा लढा आपल्याला लढायचा असून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत आवश्यक असेल असे कितीही यंत्र खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार