शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाईपलाईन ठरली पाणी पुरवठ्यात नापास

By admin | Updated: April 14, 2016 01:12 IST

येथील वॉर्ड नं. १ मधील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली ओरड लक्षात घेता गत फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली.

नागभीड : येथील वॉर्ड नं. १ मधील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली ओरड लक्षात घेता गत फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. पण योग्य नियोजन करण्यात न आल्याने पाणी पुरवठा करण्यास ही पाईप लाईन अपयशी ठरली आहे.येथील वॉर्ड नं. १ हा विस्ताराने मोठा आहे. या वॉर्डात २ हजारच्या आसपास मतदार आहेत. सिनेमा टॉकीजजवळ असलेला टोपरेबाबा चौक, मानी मोहल्ला, सिद्धीविनायक कॉलनी, या वसाहतीसोबत अन्य वसाहतींचाही या वॉर्डात समावेश आहे. येथील टोपरे बाबा चौक आणि त्या परिसरातील नागरिकांना नागभीड मध्ये कार्यरत असलेल्या तपाळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरेशा प्रमाणात कधी मिळालेच नाही. त्यामुळे येथील लोकांची नेहमीच पाण्यासाठी ओरड असायची. लोकांची ही ओरड लक्षात घेऊन नागभीड ग्रामपंचायतीने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन पाईप लाईनचे काम करण्यात आले.नवीन पाईप लाईन टाकण्यात आल्याने आता तरी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी लोकांची अपेक्षा होती. नविन पाईपलाईनमुळे नागरिकांचे जुन्या जोडण्या खंडीत झाल्या. त्यामुळे नवीन जोडण्या कराव्या लागल्या. तरी नवीन टॉकीचे बांधकाम करावे लागले. पण नवीन पाईप लाईन टाकताना ग्रामपंचायतीने योग्य नियोजन न केल्यामुळे या चौकातील व परिसरातील नागरिकांची पाण्याविषयीची अपेक्षा भंग पावली आहे.वास्तविक टोपरेबाबा चौकाजवळच गोवर्धन चौक आहे आणि गोवर्धन चौकातून तपाळ पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईपलाईन गेली आहे. पण या पाईपलाईनला ही नवीन पाईप लाईन न जोडता बागडे यांच्या घराजवळून गेलेल्या छोट्या पाईप लाईनला ही नवीन पाईप लाईन जोडण्यात आली. त्यामुळेच पाण्याचा पुरवठा होत नाही, असा आरोप या वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. गोवर्धन चौकातून गेलेल्या पाईपलाईनला ही पाईप लाईन जोडण्यात आली असली तर पुरेसे पाणी मिळाले असते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. टोपरेबाबा चौक आणि मानीमोहल्ला या वस्तीत जवळपास १०० घरांची लोकवस्ती आहे. यातील बहुतेक लोकांना विहीर किंवा विंधन विहीरीच्या पाण्यावर आपल्या गरजा पूर्ण करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)