शिबिरातून निवडले नवीन एन.सी.सी. कॅडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:58+5:302021-09-18T04:29:58+5:30
बल्लारपूर : येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये एनसीसी भरती शिबिराचे आयोजन करण्यात आले. २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धाच्या वतीने ...

शिबिरातून निवडले नवीन एन.सी.सी. कॅडेट
बल्लारपूर : येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये एनसीसी भरती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
२१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धाच्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल वि. बी. भास्कर आणि प्रशासनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल गौस बेग यांच्या मार्गदर्शनात महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये गुरुनानक विज्ञान महाविद्यालय आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यातील एनसीसी घेऊ इच्छित असलेले अनुक्रमे ३७ आणि १०२ असे एकूण १३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यात २८ मुलींची संख्या होती.
शिबिरासाठी २१ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने ट्रेनिंग जेसीओ सुभेदार भरत सिंग आणि शिपाई हवालदार सद्गुरु सिंग यांनी जबाबदारी पार पाडली. या भरती शिबिरामध्ये नवीन विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून नवीन एनसीसी कॅडेटची निवड करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्याणी पटवर्धन यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. महेशचंद शर्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर प्राध्यापक योगेश टेकाडे यांनी भरती शिबिराची जबाबदारी पार पाडली.
170921\img-20210917-wa0004.jpg
महात्मा फुले महाविद्यालयात एन. सी.सी. भरती शिबीर