The music at the wedding is now gone | लग्नसोहळ्यात आता संगीताचे सूर गायब

लग्नसोहळ्यात आता संगीताचे सूर गायब

आधुनिक काळात डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या वऱ्हाडींना विवाह सोहळ्यात चित्रपट गीतांपासून नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी खास मेजवानी ठेवण्यात येत होती. विशेष म्हणजे, मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही लग्न समारंभासाठीही प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत होती. दरम्यानच्या काळात शिथिलता मिळताच लग्नसमारंभ धूमधडाक्यात उरकण्यात आले. एवढेच नाही तर डीजेच्या आवाजात साजरे केले गेले.

विवाह प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा क्षण. दोन वेगळे जीव साताजन्माच्या गाठीने एका विवाह बंधनात आयुष्यभरासाठी बांधले जातात. त्यांच्या भावी वाटचालीकरिता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी नातलग, सगेसोयरे इष्टमित्रांना निमंत्रण दिले जाते. रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा थाटात पार पाडला जातो. लग्नसोहळ्यात पूर्वी सनईचा सूर सर्वांच्या कानी पडायचा. त्या सनई चौघड्याचा रुबाब काही औरच होता. मात्र आता सर्वच बंद झाले आहे.

Web Title: The music at the wedding is now gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.