११ हजारांच्या सुपारीसाठी गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST2021-07-19T04:19:07+5:302021-07-19T04:19:07+5:30

बंडू कवडू संदोकार, रा. वॉर्ड क्रमांक १ दुर्गापूर, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आई-मुलासह अन्य दोन ...

Murder by strangulation for betel nut of 11 thousand | ११ हजारांच्या सुपारीसाठी गळा आवळून हत्या

११ हजारांच्या सुपारीसाठी गळा आवळून हत्या

बंडू कवडू संदोकार, रा. वॉर्ड क्रमांक १ दुर्गापूर, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आई-मुलासह अन्य दोन जणांना अटक केली आहे. जमनाबाई शत्रुघ्न गंजीर (५२), उमेश शत्रुघ्न गंजीर (२२), दोघेही रा. बाबूपेठ, करण किसन डोंगरे (२१), रा. बगड खिडकी, शंकर हनुमान तुमराम (२१), रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर, असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. ११ जुलै रोजी जमनाबाई गंजीर हिचे बंडू संदोकार याच्याशी जागेच्या कारणावरून भांडण झाले. त्याचा राग मनात ठेवून तिने मुलगा उमेश गंजीर याच्यासोबत संगनमताने बंडू संदोकारची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी करण डोंगरे व शंकर हनुमान तुकाराम याला बंडूला मारण्यासाठी ११ हजार रुपयांची सुपारी दिली. या दोघांनी शनिवारी बंडूचे घर गाठून त्याला दारू पाजली. मद्यधुंद अवस्थेत बंडूच्या तोंडात दुपट्टा कोंबून सेंट्रिंगच्या तारेने त्याचा गळा आवळला. त्याचा मृतदेह तेथेच ठेवून दोघांनी पळ काढला. बंडूचा मृतदेह पडून असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांचा चमू घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून २४ तासांच्या आत चार जणांना अटक केली. चारही जणांविरुद्ध कलम ३०२, १२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात सपोनि रोशन बावणकर, पोउनि प्रवीण सोनाने, पोउनि किशोर सहारे, सुनील गौरकार, अमोल घोरुडे, रवींद्र धुर्वे, मनोहर जाधव, संतोष आडे, योगेश्वर कौरासे, सूरज लाटकर आदींनी केली.

Web Title: Murder by strangulation for betel nut of 11 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.