शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकारी,कर्मचाऱ्यांची सायकलने एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

सायकलचा फोटो टाकणे चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सायकलवरून कार्यालयात येणार आहेत. या ...

सायकलचा फोटो टाकणे

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सायकलवरून कार्यालयात येणार आहेत. या नवीन उपक्रमाला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार असून ११ डिसेंबर रोजी मनपा कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

माझी वसुंधरा अभियान २ आॅक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले असून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत, निर्सगाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे. या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे, असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला आहे.

बॉक्स

वाहन घेऊन आल्यास ‘नो एन्ट्री’

निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणू नये, अशी तंबी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी सर्व अधिकारी, कर्मचाºयांना दिली आहे. वाहन आणल्यास त्यांना मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बॉक्स

प्रत्येकाने पाच लोकांना महत्त्व पटवून द्यावे

सदर बाब वैयक्तिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाºयांसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्त्व पटवून या अभियानाची व्याप्ती वाढविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी त्या अनुषंगाने कार्य करावे, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.

कोट

निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरिता हे अभियान सुरु केले आहे. दर शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचाºयांना सायकलने कार्यालयात येण्यास सांगितले आहे. मी स्वत:देखील शुक्रवारी सायकलनेच कार्यालयात येणार आहे.

-राजेश मोहिते, आयुक्त,

चंद्रपूर महानगरपालिका.