थकीत मालमत्ता करधारकांवर महानगरपालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:10 IST2019-03-12T22:09:50+5:302019-03-12T22:10:03+5:30
महानगरपालिकेचे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या खोलीला कुलूप ठोकला. त्यामुळे शहरातील कोचिंग क्लासेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

थकीत मालमत्ता करधारकांवर महानगरपालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेचे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या खोलीला कुलूप ठोकला. त्यामुळे शहरातील कोचिंग क्लासेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. .
शहरातील रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये तिसऱ्या माळ्यावर भरत खांडेकर हे इंग्लीश स्पिकिंग कोचिंग क्लासेस चालवितात. त्यांच्याकडे २०१५-१६ पासून तब्बल दोन लाख ९७ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासंदर्भात मनपाने त्यांना नोटीस पाठविली होती. मात्र, नोटीसकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर जप्तीची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसालाही पाठ दाखविल्यानंतर मनपाच्या जप्ती पथकाने सोमवारी रघुवंशी कॉम्पलेक्समध्ये धाड घालून कुलूप ठोकून सील करण्यात आले. झोन अधिकारी नरेंद्र बोबाटे, करविभाग प्रमुख लक्ष्णम आत्राम, कर लिपिक राजेश नवलकर, शिपाई रवींद्र इटनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.