शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

थकीत करधारकांवर मनपा उगारणार बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

शहरातील थकबाकीदारांची यादीनुसार वसुली करण्याला मनपाने प्राधान्य दिले आहे. करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. थकबाकीदारांना मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. सन २०१९ - २० या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी मनपाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

ठळक मुद्देसंजय काकडे : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढविण्यासाठी थकबाकीदारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त संजय काकडे दिले. दरम्यान झोननिहाय विशेष वसुली मोहीम राबविण्य बरोबरच थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.शहरातील थकबाकीदारांची यादीनुसार वसुली करण्याला मनपाने प्राधान्य दिले आहे. करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. थकबाकीदारांना मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. सन २०१९ - २० या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी मनपाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. याकरिता विशेष जप्ती पथक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या झोननिहाय कार्यालयात जाऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त काकडे यांनी दिला आहे. सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षात मनपा हद्दीतील कर मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनाबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास झोननिहाय आक्षेप सादर कारण्याबाबत वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार काही नागरिकांनी कार्यालयात लेखी आक्षेप सादर केले. काहींनी आक्षेप सादर न करता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाद मागितली. या संदर्भात उच्च न्यायालयाने ८ जानेवारी २०२० रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार सदर याचिकेमधील समाविष्ट असलेल्या लोकांनच मालमत्ता करासंबंधी स्थगनादेश लागू आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची कर माफी नाही, असेही आयुक्त काकडे यांनी सांगितले.न्यायालयाचा आदेश केवळ ४७ जणांना लागूमालमत्ता करासंबंधी उच्च न्यायालयाचे निर्देश हे केवळ याचिकाकर्ते व याचिकेमधील समाविष्ट इतर ४७ लोकांना लागू होते. सदर आदेशानुसार उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता व याचिकेमधील समाविष्ट इतर ४७ नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घेऊन त्यांना नव्याने देयके देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, याबाबत आक्षेपधारकांचे कर माफ झाल्याची खोटी माहिती देऊन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. मनपाने कुणाचाही कर माफ केला नाही, त्यामुळे नागरिकांनी खोट्या माहितीला बळी न पडता चालू वर्ष आणि थकीत कराचा भरणा तात्काळ मनपाच्या झोन निहाय कार्यालयात जमा करावा, असे आवाहन आयुक्त संजय काकडे यांनी केले आहे.

टॅग्स :Taxकर