शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

मनपा, न. प. नगरपंचायतींच्या मासिक सभा यापुढे गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 5:00 AM

कोरोना महामारीमुळे जीवनाची सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने सर्वच विभागांच्या सभा ऑफलाइन घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील मनपा, नगर परिषद व नगरपंचायतीच्या सभा घेतल्या जात आहेत. सभा चालविण्यासाठी निश्चित कामकाजपद्धती आहे. मात्र,  जिल्ह्यातील काही  स्वराज्य संस्थांनी मनमानी सभा चालविल्याने विरोधी सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड-१९ प्रतिबंधामुळे शासनाने ऑफलाइनवर निर्बंध लादून ऑनलाइन सभा घेणे बंधनकारक केले. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर असल्याने नगरविकास विभागाने शुक्रवारी मनपा, नगर परिषद व नगरपंचायतीच्या सभा ऑफलाइन घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे यापुढील सभा आता गाजणार असून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला फैलावर घेण्याची संधी विरोधी सदस्यांना मिळणार आहे. सरकारने हा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.कोरोना महामारीमुळे जीवनाची सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने सर्वच विभागांच्या सभा ऑफलाइन घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील मनपा, नगर परिषद व नगरपंचायतीच्या सभा घेतल्या जात आहेत. सभा चालविण्यासाठी निश्चित कामकाजपद्धती आहे. मात्र,  जिल्ह्यातील काही  स्वराज्य संस्थांनी मनमानी सभा चालविल्याने विरोधी सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती. मासिक व विशेष सभा, कार्यकारी अधिकाऱ्यांचे लेखी प्रस्ताव व सभेत झालेला निर्णय इतिवृत्तात नोंदवणे, सामान्य बैठक आणि पूर्वसूचना, गणपूर्ती आदी अनेक विषयांबाबत ऑनलाइन सभा आयोजित करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, विरोधी सदस्यांना बोलू दिले जात नाही, असा आक्षेप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरोधी सदस्यांकडून सातत्याने मांडला जात आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग कमी झाल्याने नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी आदेश जारी करून मनपा, नगर परिषद व नगरपंचायतीच्या  सभा ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्षरीत्या घेण्यास परवानगी दिली आहे.

विषयांत दुरुस्ती सुचविण्याची संधी ऑनलाइन सभेत भाग घेणे, प्रस्ताव सादर करणे व प्रस्तावाला अनुमोदन करण्याचा, दुरुस्ती सुचवण्याचा व मत देण्याचा अधिकार आदी टप्पे पूर्ण करण्याआधीच जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव पारित करून घेतले. अल्पमतात असणाऱ्या विरोधी सदस्यांना बोलण्याची संधीच नाकारण्यात आल्याचा आरोपही झाला. आता प्रत्यक्षात सभा घेण्याची परवानगी मिळाल्याने प्रश्न व उपप्रश्न विचारून माहिती घेण्याच्या अधिकार वापरता येणार आहे.

सभेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकतासभेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता अधिक पारदर्शकता येऊ शकते.लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची गाऱ्हाणी, अडचणी, आकांक्षा मांडून योग्य निर्णय करून घेण्यासही प्रत्यक्ष सभा सर्वात प्रभावी साधन ठरणार आहे. निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा किंवा ते निर्णय बदलणे, अधिकार व कर्तव्याच्या आधीन राहून विकासकामांना गती मिळण्याचीही आशा निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका