शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये दारू दुकानांच्या हालचाली वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

वैनगंगा नदी चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरी, सावली, व गोंडपिंपरी अशा तीन तालुक्यातून वाहते. सुमारे शंभर किमी अंतर असलेल्या परिसरात मदिरालये उघडण्यासाठी अनेक दिग्गज कामाला लागले आहेत. या तीन तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे मुख्य मार्ग आहेत. या मार्गावर मदिरालये सुरु करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी नदीच्या जवळ मदिरालये सुरु होणार आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूर-गडचिरोली सीमेवर मद्यसम्राटांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी २७ मे च्या निर्णयानुसार हटविण्यात  आली आहे. त्यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची सीमा असलेली वैनगंगा नदी काठावरील गावांमध्ये दारू दुकाने सुरू करण्याच्या हालचाली काही मद्यसम्राटांनी सुरू केल्याची माहिती आहे. वैनगंगा नदी चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरी, सावली, व गोंडपिंपरी अशा तीन तालुक्यातून वाहते. सुमारे शंभर किमी अंतर असलेल्या परिसरात मदिरालये उघडण्यासाठी अनेक दिग्गज कामाला लागले आहेत. या तीन तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे मुख्य मार्ग आहेत. या मार्गावर मदिरालये सुरु करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी नदीच्या जवळ मदिरालये सुरु होणार आहेत. वैनगंगा नदीपासून गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी, आणि आष्टी ही शहरे ७ ते १२ किमी अंतरावर आहेत. या परिसरातील मद्यप्रेमींच्या सुविधेसाठी ब्रम्हपुरी, सावली, आणि गोंडपिंपरी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये मदिरालये सुरु होण्याच्या हालचाली सुरू आहेत.चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी होण्याआधी ही या परिसरात मोठ्या प्रमाणात मदिरालये उघडण्यात आली होती. त्याच ठिकाणी व इतरही अनेक सोईच्या जागी मदिरालये उघडण्यासाठी धावपळ करीत असल्याचे बोलले जात आहे. या मदिरालयांमधून गडचिरोली जिल्ह्यात दारुची अवैध वाहतूक करणे सोईचे ठरणारे आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी या तालुक्यात मदिरालये सुरु करण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे सांगितले जात आहे.  अलीकडेच उत्पादक शुल्क विभागाने प्रत्येक तालुक्यात किमान २५ दुकाने सुरू करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.त्यामुळे  दारूच्या क्षेत्रातील दिग्गजांची नजर याच तालुक्यावर आहे. अनेक राजकीय पुढारी सुद्धा या कामासाठी व्यस्त असल्याने दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी