आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:49+5:30

मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदावर सद्यस्थितीमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी मानधन दिल्या जात आहे.

Movement of health workers in front of Zilla Parishad | आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देमागण्यांकडे वेधले लक्ष : मानधन देण्यात दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदावर सद्यस्थितीमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी मानधन दिल्या जात आहे. एचएममध्ये नव्याने रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यरतजुने व दीर्घकालीन अनुभव असलेले कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानधन देणे अन्यायकारक आहे. नैसर्गिक न्यायाने जुने व अनुभवी कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यापेक्षा जास्त मानधन अपेक्षित आहे. समायोजनाबाबत त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाचा शासन निर्णय जारी करावा, वैद्यकीय देयकाची प्रतीपूर्ती सुविधा द्यावी, कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला सेवेत सामावून घ्यावे. वैद्यकीय रजा १५ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Movement of health workers in front of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.