शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

लॉकडाऊनमध्ये मोहफुल दारुविक्रेते सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, ठाणेदार रामटेके, पोलीस उप निरिक्षक सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक नेरकर, पोलीस उपनिरिक्षक पाटील आदींनी केली.

ठळक मुद्देचार ठिकाणी धाड । २३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात हातभट्टीद्धारे मोहफुलाची दारु काढून विक्री करणारे दारुविक्रेते सक्रीय झाले. याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून दुर्गापूर, सिंदेवाही, चंद्रपूर येथे धाड टाकून २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दुर्गापूर येथील इरई नदीजवळील पायली शिवारात मोहफुलाची हातभट्टी सुरु असल्याच्या माहितीवरुन ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात धाड टाकून ४० प्लास्टिक ड्राम चार हजार लिटर मोहसडवा, ३० प्लास्टिकच्या छोट्या ड्राममध्ये ६०० लि. मोह सडवा, एक दुचाकी असा १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक प्रवीण सोनोणे, पोहवा सुनील गौरकार, अशोक मंजुळकर, पोना उमेश वाघमारे यांनी केली.सिंदेवाही येथील सरडपार नाल्याजवळ पोलिसांनी छापा टाकून ८० प्लास्टिक ड्रॉममध्ये चार हजार किलो मोह सडवा, ३० नग मातीच्या मटक्यामध्ये ७५० किलो मोह सडवा असा एकूण ११ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, ठाणेदार रामटेके, पोलीस उप निरिक्षक सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक नेरकर, पोलीस उपनिरिक्षक पाटील आदींनी केली.रामनगर पोलिसांनी लोहारा जंगल परिसरात धाड टाकून एक लाख तीन हजार रुपयांचा तर महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात धाड टाकून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हीकारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी