शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१७२ गावात मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीकरण केल्या जाते. ग्रामीण भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात वेंडली अंगणवाडी केंद्रातून झाली.

ठळक मुद्देजि. प. आरोग्य विभागाचा उपक्रम : वेंडली अंगणवाडी केंद्रातून सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारपासून जिल्ह्यातील १७२ गावांत मिशन इंद्रधनुष लसीकरणाला सुरवात करण्यात आली. दुर्गापूर परिसरातील ऊर्जानगर वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात या मोहिमेचे उद्घाटन झाले.केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीकरण केल्या जाते. ग्रामीण भागात विशेष मिशन इंद्रधनुष २.० मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात वेंडली अंगणवाडी केंद्रातून झाली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्त राठोड, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. जि. प. सदस्य वनिता आसुटकर यांच्या हस्ते वेंडली येथील अंगणवाडी केंद्रात अनुभव सचिन वटे या बालकाला पोलीओ, रोटा व्हायरस, ओपीव्ही, पेंन्टा लस देवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मातांना या मोहिमेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य केमा रायपुरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे उपस्थित होते. याकरिता आर्टीस्ट सुभाष सोरते, आरोग्य सहाय्यक मुरलीधर नन्नावरे, आरोग्यसेविका आर. चहांदे, अंगणवाडी सेविका सुनिता वाकडे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.लसीकरणाचे फायदेबालकांच्या निरोगी जीवनासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकापेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. सदर मोहीम डिसेंबर २०१९, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२० अशा चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. माता व पालकांनी आपल्या बालकांना मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले. 

टॅग्स :Healthआरोग्य