शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 12, 2016 03:35 IST

गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या

नागभीड : गत दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनेच्या पंपहाऊसजवळील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून निघणारे पाण्यामुळे राज्य महामार्गालगत खड्डा निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नागभीड ग्रामपंचायत प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. ही जलवाहिनी तातडीने दुरूस्त करून होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे. नागभीड शहरातील जलकुंभाला पाणी पुरवठा करण्यासाठी नागभीड - नागपूर महामार्गावर विहीर व पंपहाऊस आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पंपहाऊस जवळील मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच फुटलेल्या जलवाहिनीतून निघणाऱ्या पाण्याने खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा राज्य महामार्गाला लागून असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जलवाहिनीतून वाया जाणाऱ्या पाण्याने जलकुंभ भरण्याकरिता वेळ लागत असल्याने विद्युत खर्चसुद्धा वाढत आहे. पाणीपट्टी कर व विद्युत कर आकारणीचे माध्यमातून हा संपूर्ण खर्च नागरिकांकडून वसुल होत असल्याने येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे नळाला कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करित असल्याने रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. जनतेला पाण्याचे महत्व सांगणारे ग्रामपंचायत प्रशासनाची अवस्था दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण अशीच झाली आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागभीडकरांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)