मूल : पावसाचा खंड व दमट वातावरणामुळे धान पिकाची रोवणी व पऱ्ह्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवत असून मूल तालुक्यातील १९ गावांतील धान पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास लष्करी अळीवर नियंत्रण आणता येईल, असे तालुका कृषी अधिकारी अजय आटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मूल तालुक्यात एकूण २६ हजार २८८ हेक्टर आर शेतजमीन असून १० हजार ९७५ हेक्टर आर जागेत रोवणी करण्यात आलेली आहे. रोवणी झालेल्या व पऱ्हे असलेल्या शेतात लष्करी अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यात तालुक्यातील गडीसुर्ला,, जुनासूर्ला, विरई, बोरचांदली, मरेगाव, भवराळा, चिमढा, टेकाडी, बोडाया (बु.) चकदुगाळा, सितळा, पिपरी दीक्षित, येरगाव, भेजगाव, मूल, करवन, मारोडा, राजोली, डोंगरगाव आदि १९ गावांत लष्करी अळी प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाअंती आढळले. लष्करी अळीवर नियंत्रणासाठी शेताचे बांध स्वच्छ ठेवणे, किडीचा कोष अवस्था नष्ट करणे, धानाच्या बांधित पाणी साठवून ठेवावे.पि
१९ गावांत लष्करी अळी
By admin | Updated: September 2, 2014 23:39 IST