शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मेडिकल ऑक्सिजन ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर ठेवले बोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 5:00 AM

कोविड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जिल्ह्याला उपलब्ध होणारा ऑक्सिजन डीसीएच व डीसीएचसी रूग्णालयांनी नियमानुसारच वितरण करावे. अजिबात गळती होऊ नये, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात आले. त्रुटी आढळल्यानंतर त्या सात दिवसात दुरूस्ती करण्याच्या सूचना तज्ज्ञ पथकाने दिल्या. टेक्निकल व क्निनिकल ऑडिटमुळे ऑक्सिजन गळती दूर करून योग्य व्यवस्थापन करता येईल. कोविड रूग्णांना वैद्यकीय निकषानुसार ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन अलर्ट: त्रुटी दूर करण्याच्या सूचना

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना  जीवदान देणारे ऑॅक्सिजन एक औषधच आहे. त्यामुळे औषध विज्ञान आरोग्य निकषानुसार जिल्ह्यातील डीसीएच व डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑक्सिजन वितरण होते की नाही, याबाबत नुकतेच ऑडिट झाले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवून त्या सात दिवसांत दूर करण्याच्या सूचना दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यात ३२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या  स्थितीत ३० मेट्रिक टन ऑक्सिजन  उपलब्ध होत आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून  जिल्हा प्रशासनाने उर्वरित दोन मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे सध्या तरी मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन तुटवडा नाही. फक्त ऑक्सिजनयुक्त बेड्सची समस्या तातडीने सोडविल्यास कोविड रुग्णांना उपचार होऊ शकतात. यातून बाधित मृतांच्या संख्येलाही ब्रेक लागू शकतो. जिल्ह्यात ५ डीसीएच व ३१ डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांना ३० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामध्ये ३१ खासगी रुग्णालयाचाही समावेश आहे. उपलब्ध असलेला ऑक्सिजन रुग्णांना योग्यरीत्या मिळतो किंवा नाही, यासाठी टेक्निकल व क्निनिकल ऑडिट करण्यात आले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवले. या त्रुटी सात दिवसांत दूर करावे आणि नवीन फॉरमॅटनुसार दररोज माहिती सादर करण्याचे निर्देश हॉस्पिटलला दिले. शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करताना सुरुवातीलाच लक्ष घालण्यात आले. त्यामुळे त्रुटींची संख्या कमी असल्याचे समजते. ऑडिट पथकाने सूचना दिल्याने जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटलने त्रुटी दूर करण्याचे काम हाती घेतले आहे.

कोविड रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जिल्ह्याला उपलब्ध होणारा ऑक्सिजन डीसीएच व डीसीएचसी रूग्णालयांनी नियमानुसारच वितरण करावे. अजिबात गळती होऊ नये, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात आले. त्रुटी आढळल्यानंतर त्या सात दिवसात दुरूस्ती करण्याच्या सूचना तज्ज्ञ पथकाने दिल्या. टेक्निकल व क्निनिकल ऑडिटमुळे ऑक्सिजन गळती दूर करून योग्य व्यवस्थापन करता येईल. कोविड रूग्णांना वैद्यकीय निकषानुसार ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.- मनोहर गव्हाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी ऑक्सिजन वितरण, चंद्रपूर

एका ऑक्सिजन प्लांटचे टेंडर निघालेकोविड रूग्णांना तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी तालुकास्थळी १० पीसीए प्लांट आणि जिल्हास्थळी क्रायोजेनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. यातील एका प्रकल्पाचे टेंडर निघाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे. 

असे आहे ऑडिट पथकराज्याच्या तांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे संचालक व व्यावसायिक शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मेडिकल ऑक्सिजन पथक गठित करण्यात आले. या पथकात चंद्रपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती दररोजच अहवाल जिल्हाधिका-यांकडे सादर करते. क्निनिकल ऑडिटसाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिका-यांचा सहभाग असतो. 

अशा आहेत त्रुटी व सूचना- ऑक्सिजन वितरणाचे लॉकबूक ठेवावे- तात्पुरते नव्हे तर ॲन्युअल मेन्टेन्स करावे- ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्थित लावावे- व्हाॅल्वद्वारे रूग्णांना योग्य पुरवठा होतो काय- सरासरीपेक्षा जास्त ऑक्सिजन देऊ नये- प्रशिक्षित मनुष्यबळ नियुक्त करावे- ऑक्सिजन गळती बंद करावी- दररोजचा अहवाल तयार करावा- ऑक्सिजन संयंत्राची पाहणी व व्यवस्थापन- ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्सची माहिती द्यावी- परिचारिकांना प्रशिक्षण द्यावे- ऑक्सिजनबाबतच्या सर्व यंत्रणा अपडेट ठेवा 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन