विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:29 IST2019-03-12T22:29:26+5:302019-03-12T22:29:42+5:30
शहरातील जगन्नाथ बाबा नगरमध्ये मंगळवारी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील जगन्नाथ बाबा नगरमध्ये मंगळवारी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री घोडे असे मृतकाचे नाव आहे. गायत्रीचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. गायत्रीला तिचा पती चंदन घोडे याने व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. या त्रासाने गायत्री तणावात राहात होती. सासरच्या मंडळींनी तिला डॉक्टरांकडे नेऊन ती मानसिक रुग्ण असल्याचे भासवायला सुरुवात केली. हा त्रास असह्य झाल्याने गायत्रीने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या बहिणीने केला आहे. रामनगर पोलिसांनी तक्रारीवरून गायत्रीच्या सासू व पतीला चौकशीसाठी नेले होते.