सिद्धेश्वर, बेलापूर परिसरात अनेक कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:53+5:302021-01-14T04:23:53+5:30
राजुरा : अनेक राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. अशातच राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर व गडचांदूरपासून काही अंतरावर असलेल्या बेलापूर ...

सिद्धेश्वर, बेलापूर परिसरात अनेक कोंबड्यांचा मृत्यू
राजुरा : अनेक राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. अशातच राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर व गडचांदूरपासून काही अंतरावर असलेल्या बेलापूर येथे कोंबड्या व त्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू होत असल्याने खळबळ उडाली आहे.
राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर येथील रामस्वामी कोटनाके यांनी घरी पोसलेल्या कोंबड्या व त्यांची पिल्ले अचानक मृत्यूमुखी पडले. या गावात मागील दोन दिवसात काही लोकांच्याही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना गावाच्या बाहेर फेकण्यात आले होते. या कोंबड्यांवर गावातील कुत्र्यांनी ताव मारला. याशिवाय बेलापूर येथीलही काही जणांच्या कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. बर्ड फ्लूची चर्चा जोरात सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पशुवैद्यकीय विभागाने याची दखल घेत परिसरातील कोंबड्यांची पाहणी करावी, अशी मागणी आहे.