शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

माजरीत पुन्हा फोफावली गुन्हेगारी

By admin | Updated: December 17, 2015 01:10 IST

माजरीसह परिसरात पुन्हा गुन्हेगारांनी थैमान घातले असून रोजच कुठे ना कुठे अनूचित घटनेने दिवस उजाडतो.

परिसर भयभीत : चोरी करून चोरट्यांनी घरे जाळलीमाजरी : माजरीसह परिसरात पुन्हा गुन्हेगारांनी थैमान घातले असून रोजच कुठे ना कुठे अनूचित घटनेने दिवस उजाडतो. १२ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान पैकाजी किसन कन्नाके व त्यांच्या शेजारी कमालबाई ज्ञानेश्वर आत्राम रा. माजरी खदान दफाई नं.१ यांचे घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी तर केलीच. सोबतच सामानाची नासधूस करुन घरे जाळली होती. आता पुन्हा चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचे दिसत आहे.सदर घटनेच्या दिवशी घरचे सदस्य घरी नव्हते. कन्नाके दाम्पत्य एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे मुक्कामी होते तर मुलगा रवी हा शिक्षणासाठी वणी येथे राहतो. दुसऱ्या दिवशी घटनेची फिर्याद रवी पैकाजी कन्नाके व श्रीमती आत्राम यांनी माजरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध भांदवी ४५७, ३८०, ४३६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेत कन्नाके यांच्या घरुन ५० हजार रुपये रोख व पाच ग्रामची सोन्याची अंगठी आणि आत्राम यांच्या घरुन सोने चांदीच्या दागिण्यांची चोरी झाल्याचे फिर्यादीत सांगितले. चोरी केल्यानंतर अज्ञात आरोपींनी फ्रीज, सागवानी पलंग, दोन आलमारी, कपडे व रवी कन्नाके यांच्या शिक्षणाचे व इतर महत्त्वाची कागदपत्र जाळली. यामुळे या दोन्ही कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेमुळे माजरी परिसरात भय निर्माण झाले असून स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेची माहिती रवी कन्नाके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनाही दिली. आरोपींना जेरबंद करावे व कागदपत्रासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)