शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कर्जवसुलीसाठी सावकाराने चंद्रपूरमध्ये दोघांना घरासह पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 7:42 AM

कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला.

चंद्रपूर : कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या सावकाराने कर्जदार कुटुंबीयांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना घरासह पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी दुपारी चंद्रपुरात घडला. यामध्ये हरीणखेडे कुटुंबातील दोघांसह संबंधित सावकारही गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

रघुनाथ व कल्पना हरीणखेडे या शिक्षक दाम्पत्याने जसबीर सिंग या सावकाराकडून १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते. पैकी २ लाख रुपये मुद्दल व १ लाख २० हजार रुपये व्याज अशा ३ लाख २० हजार रुपयांची परतफेड केली. उर्वरित १ लाख रुपये देणे बाकी होते. त्यासाठी जसबीर सिंग सोमवारी हरीणखेडे यांच्या घरी गेला, तेव्हा मंगळवारी सायंकाळी ६० हजार रुपये देऊ असे त्यांनी त्याला सांगितले.मात्र जसबीर आज दुपारीच पुन्हा घरी गेला. संध्याकाळी पैसे मिळतील असे सांगताच, जसबीरने आणलेले पेट्रोल घरभर शिंपडून जळती काडी घरात फेकली. आगीचा भडका उडून घराने पेट घेतला. त्यात कल्पना हरीणखेडे (५४) व मुलगा पीयूष (२६) हे गंभीररीत्या भाजले. सावकारही जखमी झाला. त्या वेळी रघुनाथ हरीणखेडे घरात नव्हते.

आक्रोश ऐकून परिसरातील लोकांनी घराकडे धाव घेतली. लोकांनी कल्पना व पीयूष यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. जसबीर सिंग स्वत:च रुग्णालयात गेला. अग्निशमन विभागाने आग विझवली. जसबीर सिंगला अटक करण्यात आली आहे.

का केले हे कृत्य?बेकायदा सावकारी कारणाऱ्या जसबीर सिंगला हरीणखेडे कुटुंब कजाची वेळेवर परतफेड करीत होते. उर्वरित रक्कम आज सायंकाळी देण्याचे कबुल केले असताना त्याने घरावर पेट्रोल टाकून मायलेकरांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केला? यामागे त्याचा काही वाईट हेतू होता का? पैसे मागायला जाताना तो पेट्रोल का घेऊन गेला? या प्रश्नांचा छडा पोलिसांना लावावा लागेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआग