शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

परवाना नूतनीकरण निकषांकडे आता लिकर लॉबीची नजर, दारूबंदी उठताच खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:50 IST

Chandrapur News: २०१५ मध्ये दारूबंंदी झाल्यापासून लिकर लॉबीवर अवकळा आली. अनेकांनी नवीन व्यवसाय सुरू केले. आता येत्या काही दिवसांत दारूबंदी मागे घेतल्याची अधिसूचना जारी होईल.

- राजेश मडावीचंद्रपूर : राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा धाडसी निर्णय घेताच लिकर लॉबी सुखावली. काही दिवसात यासंदर्भात अधिसूचनाही जारी होईल. मात्र मद्यविक्री परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार का, याकडे आता लिकर लॉबीचे लक्ष लागले आहे.२०१५ मध्ये दारूबंंदी झाल्यापासून लिकर लॉबीवर अवकळा आली. अनेकांनी नवीन व्यवसाय सुरू केले. आता येत्या काही दिवसांत दारूबंदी मागे घेतल्याची अधिसूचना जारी होईल. त्यानंतर जिल्हा समिती गठित होऊन नवीन परवाने देणे किंवा जुन्या परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. परंतु परवाना नूतनीकरणासाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार की जुनेच निकष कायम ठेवणार, याबाबत लिकर लॉबीत आता खलबते सुरू झाली आहेत.राज्यात मद्य विक्रीसाठी चारप्रकारचे परवाने दिले जातात. यामध्ये एफएल (फॉरेन लिकर) विदेशी मद्य, एफएल- (बीआर बीअर) विदेशी मद्य बीअर, नमुना ई २ म्हणजे वाईनसाठीचा परवाना आणि सीएल (कंट्री लिकर) देशी दारू आदींचा समावेश आहे. 

चंद्रपुरात सीएल, एफएल ३, ४ ची संख्या अधिकचंद्रपूर जिल्ह्यात १०९ देशी दारू दुकाने, २४ वॉईन शॉप, ३२० वॉईन बार आणि १० बीअर शॉपी सुरू होते. वरील चार प्रकारांतही पुन्हा एफएल -२, एफएल-३, एफएल- ४, एफएल बीआर -२, नमुना ई २ सीएल ३ आणि सीएल-एफएल टीओडी ३ असे प्रकार पाडण्यात आले आहेत. सीएल ३ आणि एफएल- २ वर शासनाने बंदी घातली. चंद्रपुरात सीएल (कंट्री लिकर) व एफएल -३ आणि -४ ची संख्या अधिक होती. 

लोकसंख्येनुसार भरावा लागतो कर शुल्काची आकारणी दरवर्षी केली जाते. मद्य विक्रीचे दुकान असलेल्या क्षेत्राच्या लोकसंख्येनुसार शुल्क महसूल भरावा लागतो. पाच वर्षांपूर्वी एफएल-२ साठी ५० हजार लोकसंख्या असल्यास ६५ हजार शुल्क द्यावे लागत होते. त्यापुढील लोकसंख्येसाठी या शुल्कात पुन्हा वाढ होते. पाच वर्षांत जिल्ह्याच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता जादा शुल्क भरावे लागणार आहे. याच निकषांमुळे मागील पाच वर्षांत २ हजार ५७० कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीchandrapur-pcचंद्रपूर