शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

मद्यविक्री परवाना नुतनीकरणाच्या निकषांकडे लिकर लॉबीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात दारूबंदीबाबत अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर जिल्हा समिती गठित होऊन नवीन परवाने देणे किंवा जुन्या परवान्याच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. परंतु परवाना नुतनीकरणासाठी  राज्य सरकार  नवीन निकष लागू करणार की जुनेच निकष कायम ठेवणार, याबाबत चंद्रपुरातील लिकर लॉबीत आता खलबते सुरू झाली आहेत.

ठळक मुद्देदारूबंदी उठताच खलबते सुरू : मद्यविक्रीचा परवाना विकणाऱ्यांना पश्चात्ताप ?

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा धाडसी निर्णय घेताच लिकर लॉबी सुखावली. काही दिवसात यासंदर्भात अधिसूचनाही जारी होईल. मात्र मद्यविक्री परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार का, याकडे आता लिकर लॉबीचे लक्ष लागले आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात दारूविरूद्ध महिलांचे आंदोलन पेटल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने १ एप्रिल २०१५ रोजी दारूबंंदी केली. तेव्हापासून लिकर लॉबीवर अवकळा आली तर अनेकांनी नवीन व्यवसाय सुरू केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निवृत्त अधिकारी रमाकांत झा समितीच्या शिफारशींवरून गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी विरोधही दर्शविला. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात दारूबंदीबाबत अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर जिल्हा समिती गठित होऊन नवीन परवाने देणे किंवा जुन्या परवान्याच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. परंतु परवाना नुतनीकरणासाठी  राज्य सरकार  नवीन निकष लागू करणार की जुनेच निकष कायम ठेवणार, याबाबत चंद्रपुरातील लिकर लॉबीत आता खलबते सुरू झाली आहेत.  राज्य शासन अधिसूचना  कधी जारी करणार याकडे आता  लिकर लॉबीसह जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे. 

नुतनीकरणासाठी लागणारे प्रमाणपत्रसीएल, एफएल, बियर, वाईन शॉपीचा नवीन परवाना अथवा नुतनीकरणासाठी हॉटेलचा परवाना, जागेचा नकाशा, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभागाची परवानगी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ना हरकत, आयकर व विक्रीकर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र, डीडी, बँक हमी, ऐपत पत्र व अन्य कागदपत्रे लागतात.  राज्याच्या           उत्पादन व  शुल्क विभागाकडून इच्छूकांचे ऑनलाईन अर्ज व   प्रमाणपत्र स्वीकारले जाते. 

जिल्हा समिती करणार प्रस्तावांची पडताळणीपात्र झालेल्या अर्ज व कागदपत्रांची पडताळणी जिल्हा समिती करते. या समितीत अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव म्हणून उत्पादन व शुल्क विभागाचे अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी  अधिकारी व पोलीस अधीक्षकांचा समावेश असतो. परवाना नुतनीकरणासाठी या समितीचा निर्णय अंतिम असतो.

मद्यविक्रीसाठी परवान्यांचे प्रकार किती ?राज्यात मद्य विक्रीसाठी चार प्रकारचे परवाने दिले जातात. यामध्ये एफएल (फॉरेन लिकर) विदेशी मद्य, एफएल- (बीआर बीअर) विदेशी मद्य बीअर, नमुना ई २ म्हणजे वाईनसाठीचा परवाना आणि सीएल (कंट्री लिकर) देशी दारू आदींचा समावेश आहे. राज्य शासनाने या चार प्रकारातही आणखी उपप्रकार पाडले आहेत.

जिल्ह्यात सीएल, एफएल ३, ४ च्या परवान्यांची संख्या अधिक चंद्रपूर जिल्ह्यात १०९ देशी दारू दुकाने, २४ वॉईन शॉप, ३२० वॉईन बार आणि १० बीअर शॉपी सुरू होते. वरील चार प्रकारातही पुन्हा एफएल -२, एफएल-३, एफएल- ४, एफएल बीआर -२, नमुना ई २ सीएल ३ आणि सीएल-एफएल टीओडी ३ असे प्रकार पाडण्यात आले आहेत.  सीएल ३ आणि एफएल- २ वर शासनाने बंदी घातली. चंद्रपुरात सीएल (कंट्री लिकर) व एफएल -३  आणि -४ ची संख्या अधिक होती. जुन्या परवान्यांचे नुतनीकरण करताना कोणते प्रकार राहणार याबाबत सध्यातरी काही सांगता येत नाही, अशी माहिती एका जुन्या परवाधारक मद्य विक्रेत्याने ‘लोकमत’ ला दिली.  

 

टॅग्स :liquor banदारूबंदी