शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्सची मुदत संपली, अपॉइंटमेंट घेतलीय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. केवळ १५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहे. परंतु, मागील काही महिने कामे ठप्प असल्याने चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप वाढला आहे. अनेकांच्या परवान्याची मुदत संपली आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक कार्यालयात अपाॅइंटमेंटशिवाय प्रवेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बंद होते. त्यामुळे अनेकांचे परवान्याची मुदत संपली आहे, अशाना ३० जूनपर्यंत नुतनीकरणाचा कालावधी वाढवून दिला आहे. परंतु, त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन नुतनीकरण करावे, लागणार आहे. सध्यास्थितीत अपॉईंटमेंट फुल्ल झाल्याचे दिसून येत असल्याने नुतनीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद होते. केवळ १५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहे. परंतु, मागील काही महिने कामे ठप्प असल्याने चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप वाढला आहे. अनेकांच्या परवान्याची मुदत संपली आहे. आता त्यांना परवाना नुतनीकरणासाठी ३० जूनपर्यंतचा कालावधील देण्यात आला आहे. परंतु, अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय परवानगी देणे बंद आहे. अनेकांनी परवान्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली असल्याने सध्यास्थितीत अपॉइंटमेट फुल्ल असल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रत्येकालाच नुतनीकरणाची संधी देण्यात येणार आहे. 

तापमान तपासूनच प्रवेशकार्यालयात जे व्यक्ती कामानिमित्त येतात. त्या प्रत्येकांचे तापमान तपासून त्यांची नोंद करुन प्रवेश दिला जातो. मास्क घालून नसल्यास त्याला प्रवेश नाही. कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. घोळका करुन बसण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

अशी घ्या अपॉइंटमेंटज्यांचा परवाना नुतनीकरण करायचा आहे. किंवा इतर कामे करायची आहेत. त्यांना अपाइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावून आपली नोंदणी करुन कामाच्या तपशिलाबाबत माहिती भरुन अपॉइंटमेंट करणे गरजेचे आहे.

असा आहे कोटाचंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयातंर्गत कोरोना नियम पाळून गर्दी होऊ नये, म्हणून दररोज शिकाऊ उमेदवारांसाठी ७०, व कायम परवान्यासाठी प्रत्येकी ५० जणांनाच अपॉंइटमेंट देण्यात येत आहे. 

परिवहन अधिकारी म्हणतात...कोरोनाचे नियम पाळून कामे करण्यात येत आहेत. ६० टक्के कामे पूर्वपदावर आली आहेत. मुदत संपलेल्यांना वाहन परवान्यांची मुदत ३० जूनपर्यंत वाढवून दिली आहे. नुतनीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे. सर्वांचे नुतनीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही कार्यालयात गर्दी करु नये, तसेच मास्क घालून कोरोनाच्या नियमांचे पालन करुन कार्यालयात यावे.-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस