आधी गप्पा नंतर व्हाॅट्सॲप चॅट..., वकील अडकला 'हनी ट्रॅप'मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 11:29 IST2021-11-25T11:03:06+5:302021-11-25T11:29:28+5:30

गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले.

lawyer was caught in a honeytrap In Chandrapur district | आधी गप्पा नंतर व्हाॅट्सॲप चॅट..., वकील अडकला 'हनी ट्रॅप'मध्ये

आधी गप्पा नंतर व्हाॅट्सॲप चॅट..., वकील अडकला 'हनी ट्रॅप'मध्ये

ठळक मुद्देव्हिडिओ कॉलवर नग्न करून केले ब्लॅकमेल

चंद्रपूर :  जिल्ह्यातील एक तरुण वकील हनीट्रॅपमध्ये अडकल्याची घटना पुढे आली आहे. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एका मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसांत गेले.

हा तरुण वकील समाज माध्यमांवर एका तरुणीच्या संपर्कात आला. आधी गप्पा आणि नंतर व्हाॅट्सॲप चॅट होऊ लागले. तरुणी मात्र नियोजनबद्ध पद्धतीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत होती. ही बाब वकिलाच्या लक्षातच आली नाही. हा सिलसिला पुढे व्हिडिओ कॉलिंगपर्यंत गेला आणि त्यात सर्व अश्लील हरकती सुरू झाल्या. त्यानंतर मुलीने रंग दाखवायला सुरुवात केली.

व्हिडिओत स्वतः नग्न होत वकिलाला देखील गुंग करत नग्न करविले. या सर्व कृत्याचे रेकॉर्डिंग करत वकिलाचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. पैशांची मागणी सुरू झाली. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर सार्वत्रिक बदनामी करू, अशी धमकी वकिलाला मिळू लागली.

या धमकीमुळे हा वकील घाबरला आणि काही मित्रांना घडलेली गोष्ट सांगितली. त्यांनी त्यांना धीर देत पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. शेवटी बदनामीची भीती मनातून काढत पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती पीडित वकिलाने ‘लोकमत’ला दिली.

Web Title: lawyer was caught in a honeytrap In Chandrapur district