शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लावारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: June 13, 2014 00:01 IST

तालुक्यातील लावारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २२ जूनला होत आहे. सात जागांपैकी एक जागा अविरोध निवडून आल्यामुळे सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बल्लारपूर : तालुक्यातील लावारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २२ जूनला होत आहे. सात जागांपैकी एक जागा अविरोध निवडून आल्यामुळे सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसप्रणित व भाजपाप्रणित पॅनल आमने-सामने आल्याने येथील निवडणुकीत अटीतटीचा सामना होत आहे.लावारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या २२ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. येथील प्रभाग एकमध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी धीरज देवानंद निरंजने व संध्या सारीपूत्र निरंजने यांच्यात लढत आहे. या प्रभागातून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर शंकुतला वेलादी यापूर्वीच अविरोध निवडून आल्या.येथील प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिला राखीव गटात वनिता मारोती चुनारकर व मंजुळा भारत टेकाम, नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव जागेसाठी वैशाली योगेश पोतराजे व सावित्रा रामचंद्र ठावरी तर अनुसूचित जमाती राखीव गटात पंढरी बाबुराव कोडापे व प्रेमकुमार टेकाम एकमेकांशी निवडून येण्यासाठी लढत देत आहेत.प्रभाग तीनमधील लढतीकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून येथील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षित जागेवर उपसरपंच योगेश रामदास पोतराजे व गुणवंत मारोती भोयर यांच्यातील संघर्ष लक्ष वेधणारा असल्याची चर्चा मतदारांमध्ये केली जात आहे. याच प्रभागातील अनुसूचित जाती महिला राखीव जागेवर शोभा प्रमोद गोरघाटे व शिला प्रफुल्ल गोरघाटे यांच्यात काट्याची लढत होत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून एकास एक उमेदवार मैदानात उतरले असल्याने तालुक्यातील राजकारण्यांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे वातावरण तापत आहे. (शहर प्रतिनिधी)