शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा

By admin | Updated: July 27, 2014 23:39 IST

या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट

शेतकरी हतबल : दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीतचंद्रपूर : या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आधी पावसाने डोळे वटारले नंतर संततधार पावसाने झोडपले; आणि आता मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. मजुरीचा वाढता दर बघून तर, त्याचे जगणे आणखी कठीण होत आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल महिन्याभरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे नष्ट झाले. अशा परिस्थितीत अनेकांनी दुबार पेरणी करून आलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर संततधार पावसाने हजेरी लावून पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यामुळे शेतात पाणी साचले आणि नानाविध समस्या निर्माण झाल्या.अशातच पेरणी केलेले बियाणे पऱ्ह्यांच्या स्वरूपात रोवणीयोग्य झाल्यानंतर आता काहींनी रोवणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र मजुरांचा तुटवडा आणि मजुरीच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मूल, सावली, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा आदी तालुक्यांमध्ये भातासाठी तर कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती आदी तालुक्यांमध्ये कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या दोन्ही कामांसाठी मजुरांची मोठी मागणी असते. मात्र मजूरी वाढूनही शेतकऱ्यांना मजुर मिळणे कठिण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)