गोंडपिपरीतील कपिलची आत्महत्या नसून घातपातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:39+5:30
ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला, तेव्हा घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरुणी वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ती पुढाकार घेत होती. यामुळे वराते कुटुंबीयांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. घटनेला आठ दिवस लोटले. मात्र पोलिसांनी अद्यापही कुटुंबीयांचा जबाब नोंदविला नाही.

गोंडपिपरीतील कपिलची आत्महत्या नसून घातपातच
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : गोंडपिपरी शहरातील महिंद्रा होम फायनान्समध्ये रोखपाल या पदावर कार्यरत कपिल वराते या तरुणाचा कार्यालयातच गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कपिलने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेतून केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्याची त्यांनी मागणी केली.
३ एप्रिल रोजी गोंडपिपरीस्थित महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात रोखपाल कपिल वराते या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. दरम्यान, कपिलने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. कपिल हा चेकदरूर येथील रहिवासी होता. ज्या दिवशी त्याचा मृतदेह गोंडपिपरीतील कार्यालयात आढळला, तेव्हा घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती. त्याच वेळी चेकदरूर येथील एक तरुणी वराते कुटुंबीयांना घटनेची माहिती न देता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. घटनेनंतर प्रत्येक सोपस्कारात ती पुढाकार घेत होती. यामुळे वराते कुटुंबीयांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. घटनेला आठ दिवस लोटले. मात्र पोलिसांनी अद्यापही कुटुंबीयांचा जबाब नोंदविला नाही. या प्रकरणाची कुठलीच चौकशी केली नाही. दरम्यान ती तरुणी गावात नसल्याने कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला आहे. कपिलने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला आहे, असा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; जेणेकरून सत्य समोर येईल, अशी मागणी कपिलची आई कुसुम वराते व भाऊ देविदास वराते यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कुटुंबीयांनी उपस्थित केल्या या शंका
या घटनेबाबत कुटुंबीयांनी आता विविध शंका उपस्थित केल्या आहेत. कपिलचे पुढच्या महिन्यात लग्न होते. तो कुठल्याच आर्थिक विवंचनेत नव्हता. आपल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस व महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयाकडून आम्हाला कुठलीच माहिती देण्यात आली नाही. घटनेनंतर खूप उशिराने कपिलचा अपघात झाला. ही माहिती गावातून मिळाल्याने आम्ही गोंडपिपरीला पोहोचलो. मात्र तिथे गेल्यानंतर कार्यालयातच कपिलचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह असल्याचे समजले. घटनास्थळी कार्यालयाचे शटर बंद करून पोलीस चौकशी करीत होते आणि आम्हाला बाहेर थांबविण्यात आले. चौकशीअंती कार्यालयाचे शटर उघडण्यात आले, तेव्हा मृतदेह बघण्यासाठी आम्ही गेलो. यावेळी कपिल ज्या अवस्थेत होता, ती अवस्था बघून त्याने आत्महत्या केली असे वाटत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.