शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

अवघ्या चार तासात ‘ते’ झाले बेघर

By admin | Updated: May 24, 2017 02:16 IST

दिवस सोमवार, वेळ दुपारी १.३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली.

सचिन सरपटवार। लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : दिवस सोमवार, वेळ दुपारी १.३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली. ठिणगीने रौद्ररूप धारण केले आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. रान तळोधीतील ३५ घरे या आगीने आपल्या कवेत घेतली. एकीकडे सूर्य कोपला होता अन् दुसरीकडे आगीचे भयंकर रूप होते. लहानग्यांचा टाहो होता. मोठ्यांची मदतीची हाक होती अन् जनावरांचे हंबरणे होते. दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान ३५ कुटुंबे बेघर झाली. काही बकऱ्या मरण पावल्या. दोन वासरे जखमी झाली. हिरवागार परिसर काळाकुट्ट झाला. त्यातच सर्वत्र पसरली होती ती राख. सर्व काही डोळ्यासमोर घडले पण दैवासमोर काहीच चालले नाही. रानतळोधी वासीयांच्या आयुष्यातील हे चारतास अंगावर शहारे निर्माण करणारे होते. अंदाजे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधील रानतळोधी येथे २०१० मध्ये आग लागून अनेक घरे भस्मसात झाली होती. सोमवारच्या आगीत भांडे, कपडे, रक्कम सर्वच गेले. एकाएकी बेघर झाले. तहसील कार्यालय भद्रावतीतर्फे सकाळच्या जेवणाची सोय करण्यात आली. रात्री व उद्याच्या जेवणाची सोय स्वस्त धान्य दुकानदार, रानतळोधीातर्फे करण्यात आली. आज महसुुल विभागातर्फे घरांचा पंचनामा करण्यात आला. ३५ घरे पूर्णत: तर चार घरे अंशत: अशा ३९ घरांचा पंचनामा करण्यात आला. निराधार झालेल्या ३५ कुटुंबांनी अंगणवाडी शाळा, समाज भवन तर कोणी गावातल्या नातेवाईकाकडे आश्रय घेतला. भद्रावती न.प. मूल न.प. सिटीपीएस येथील अग्नीशमन दलातर्फे आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले. भद्रावतीचे तहसिलदार सचिन कुमावत, नायब तहसिलदार आर. काळे, महसुल विभागाचे कर्मचारी धनराज पारसे, निलेश देठे, भागवत नाईकवाडे, मून, सुरेश डाखरे, अतुल खापने, वामन कोपलकवार, ठाणेदार विलास निकम, वनविभागाचे अधिकारी एसडिपीओ, एसडिओ, हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. अनुदान देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.