बिबट्याच्या हल्ल्यात इसम ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:32+5:30

नरेश आज पहाटे या परिसरातून जात असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत आणखी काही मित्र होते. बिबट्याने त्याच्यावर हल्ला करताच हे मित्र पळून गेले. या हल्ल्यात नरेशचा जागीच मृत्यू झाला. कोळसा खाणीत गस्तीवर असलेल्या सुरक्षा प्रहरीना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून वनविभागाला याची माहिती दिली.

Ism killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात इसम ठार

बिबट्याच्या हल्ल्यात इसम ठार

ठळक मुद्देदुर्गापूर कोळसा खाण परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 
दुर्गापूर : कोळसा खाणीतील मॅनेजर ऑफिस लगतच्या जंगल परिसरात मंगळवारी पहाटे बिबट्याने एका इसमास ठार केल्याची घटना घडली. ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.
नरेश सोनवणे रा. दुर्गापुर वार्ड क्रमांक तीन असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. नरेश आज पहाटे या परिसरातून जात असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत आणखी काही मित्र होते. बिबट्याने त्याच्यावर हल्ला करताच हे मित्र पळून गेले. या हल्ल्यात नरेशचा जागीच मृत्यू झाला. कोळसा खाणीत गस्तीवर असलेल्या सुरक्षा प्रहरीना सदर घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ११ जानेवारीला मॅनेजर ऑफिसच्या पाठीमागे बिबट्याने एका युवकास गंभीर जखमी केले, त्यापाठोपाठ १६ जानेवारीला दुर्गापुर कोळसा खाणीतील सब स्टेशनच्या मागे बिबट्याने एका इसमास ठार केले होते. या घटनेला एक महिना होत नाही तर बिबट्याने परत आज एका इसमास ठार केल्याची दुसरी घटना घडली. या सलग घडलेल्या तीन घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वेळीच या नरभक्षी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Ism killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.