जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

By साईनाथ कुचनकार | Published: February 27, 2024 07:20 PM2024-02-27T19:20:57+5:302024-02-27T19:21:20+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला.

Is food, medicine received on time? Questioning of patients by District Collector | जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

चंद्रपूर : जेवण, औषध वेळेवर मिळते का? डॉक्टर लक्ष देतात का? कोणता आजार आहे? असे अनेक प्रश्न जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी रुग्णांना विचारले. बल्लारपूर, राजुरा येथील रुग्णालयातील सोयी-सुविधांचा त्यांनी मंगळवारी, दि. २७ फेब्रुवारी रोजी आढावा घेतला.

जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व स्थानिक स्तरावर उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांस भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयांतील उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी (बल्लारपूर) स्नेहल रहाटे, रवींद्र माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कळसकर, बल्लारपूरचे तहसीलदार ओमकार ठाकरे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गौंड आदी उपस्थित होते.

रुग्णांना विचारले हे प्रश्न
जेवण वेळेवर मिळते का? कधी भरती झाले? कोणता आजार आहे? असे प्रश्न विचारून लवकर बरे व्हा, असा आशावाद व्यक्त केला. रुग्णांनीसुद्धा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इंटर्न डॉक्टरांची उपलब्धता, मनुष्यबळ, औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, डॉक्टरांसाठी निवासव्यवस्था, तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली.

विविध विभागांची पाहणी
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बल्लारपूर आणि राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, क्ष-किरण विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, संसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष, आयुष विभाग, अपघात विभाग स्त्री व पुरुष रुग्ण विभाग, बाल उपचार केंद्र, हिरकणी कक्ष, अलगीकरण कक्ष आदी विभागांस भेट देत आरोग्य व्यवस्था व सुविधांची पाहणी केली.

Web Title: Is food, medicine received on time? Questioning of patients by District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.