शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:10 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणी करताना योग्य मोबदला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, यावर चर्चा करण्याकरिता ऊर्जा मंत्रालय मुंबई येथे बुधवारी ऊर्जामंत्र्यांनी बैठक बोलाविली. यात टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देमंत्रालयात बैठक : बाळू धानोरकरांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर उभारणी करताना योग्य मोबदला देण्यात येत नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, यावर चर्चा करण्याकरिता ऊर्जा मंत्रालय मुंबई येथे बुधवारी ऊर्जामंत्र्यांनी बैठक बोलाविली. यात टॉवर लाईनचे काम बंद करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.वरोरा तालुक्यातीलगावाच्या परिसरात ट्रान्समिशनचे सबस्टेशनची उभारणी करण्यात येत आहे. या परिसरातून वरोरा- राजनांदगाव (रायपूर), वरोरा- करनूल, रायगड पुगलूर, वर्धा परळी ७६५,८०० केव्हीचे टॉवरची उभारणी केली जात आहे. टॉवरग्रस्त शेतकºयांच्या ३१ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार अकृषक वाणिज्य दराने मोबदला व पीक नुकसान देण्यात यावा, या मागणीकरिता आमदार बाळू धानोरकर यांनी शेतकºयांना सोबत घेवून अनेक आंदोलने केली. प्रत्येक वेळी टॉवर उभारणी करणाºया कंपनीने पोलिसांना हाताशी घेवून शेतकºयांना धाक दाखवून टॉवरचा व पीक नुकसानीचा योग्य मोबदला न देता टॉवरची उभारणी करणे सुरूच ठेवले. यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष पसरत आहे. त्याच टॉवरग्रस्त शेतकºयांना योग्य मोबदला देण्यात यावा, याकरिता आमदार बाळू धानोरकर सातत्याने आग्रही असून त्याबाबत संबंधित विभागाशी पत्र व्यवहारही सुरु ठेवला. प्रसंगी आंदोलन व उपोषणाचा मार्गही पत्करला.त्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी बुधवारी मुंबई येथे टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याकरिता बैठकीचे आयोजन केले. बैठकीमध्ये आमदार बाळू धानोरकर, ऊर्जा प्रधान सचिव, महापारेषण व्यवस्थापकीय संचालक, पॉवरग्रीड कंपनीचे अधिकारी, चंद्रपूर जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी उर्जामंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना पुनर्मुल्यांकन करुन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले.शासन निर्णयात तरतूद करणारटॉवर पायाभरणी फुटींगचा मोबदला केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील ३.२ नुसार १०० टक्के देण्याबाबत, तसेच ७६५ केव्ही ट्रान्समिशन लाईनच्या वायर कॉरीडोरची मोजणी ही केंद्र शासन परिपत्रक २०१५ मधील १.३ नुसार ६७ मीटर व ८०० केव्हीसाठी ६९ मीटरचा मोबदला आणि तारेखालील जमिनीचा मोबदला १० टक्के देण्याबाबत या संबंधीची सुधारणा शासन निर्णयात करुन याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.मागील कित्येक वर्षापासून टॉवर उभारणी करताना शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केल्या जात होता. आपण स्वत: शेतकऱ्यांना सोबत घेवून आंदोलन केले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार आहे.- बाळू धानोरकर, आमदार वरोरा- भद्रावती विधानसभा