शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

By admin | Updated: May 15, 2017 00:45 IST

शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली.

गुप्ता कुटुंबीयांचे सांत्वन : अहीर यांनी केली वादळी भागाची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण नुकसानीचे सर्वेक्षण करून सर्वच नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळण्याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.ना. अहीर यांनी लालपेठ व जलनगर परिसरात प्रत्यक्ष भेट देवून प्रभावित कुटुंबीयांशी चर्चा केली. या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी ना. अहीर यांनी शहरातील वाढलेल्या वृक्षांमुळे दुर्दैवी घटनामध्ये भर पडत असल्याने या वृक्षांच्या फांद्या तोडण्याची सूचना केली. नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात दुर्दैवी घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच लोकांचे कमीत कमी नुकसान होईल, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावरून प्रभावीपणे उपाययोजण्याबाबत अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पूर्व नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या.लालपेठ परिसरात झाड कोसळून गुप्ता यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ना. अहीर यांनी त्या कुटुंबाचे सांत्वन केले. या पाहणीमध्ये उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप गटनेते वसंत देशमुख, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार खांडरे, नायब तहसीलदार घोरपडे, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भगत आदी उपस्थित होते. वादळग्रस्त भागाच्या पाहणी दौराप्रसंगी ना. हंसराज अहीर यांच्यासोबत लालपेठ प्रभागाचे नगरसेवक शाम कनकम, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, मोहन चौधरी, संजय मिसलवार, भानेश मातंगी, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, राजकुमार चौधरी, सोनकुसरे, स्वप्नील कांबळे, क्रिष्णा यादव आदी उपस्थित होते.शेख जब्बीर कुटुंबीयांचे सांत्वनजलनगर वॉर्डातील शेख जब्बीर यांच्या सुहाना परवीन या दीड वर्षीय मुलीचे घराजवळील नालीत पडून नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबाच्या निवासस्थानी जावून त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे गटनेते वसंता देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. राहुल घोटेकर, मोहन चौधरी आदींची उपस्थिती होती. अशा दुर्घटना भविष्यात घडू नय, यासाठी महानगरातील प्रत्येक प्रभागातील नाल्याची स्वच्छता तुंबलेल्या नाल्या व गाळ मिश्रित नाल्या व मोठे नाले सदैव स्वच्छ राहतील, याची दक्षता मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनावजा अपेक्षा ना. अहीर यांनी व्यक्त केल्या.