शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याऐवजी फुलांच्या शेतीकडे वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

देलनवाडी हे गाव शंकरपट तसेच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. कायदे बदलल्याने शंकरपट बंद झाला. देलनवाडी व पळसगावच्या सीमेवरून बोकडी नदी लहान असल्याने दोन्ही गावच्या शेतकºयांना पाण्याचा लाभ घेता येतो. वीजपंप व अथवा विहिरी नसतानाही बोकडी नदीचे पाणी शेतकरी नदीतच खड्डा करून अडवतात आणि मोटाच्या सहाय्याने भाजीपाला लागवडीसाठी वापरतात.

ठळक मुद्देप्रयोगशील शेती। देलनवाडी येथील अनेक शेतकऱ्यांकडून पारंपरिक शेतीला बगल

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे अनेक वर्षांपासून भाजीपाला लागवड केला जात आहे. मात्र, यातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नगदी पिकांचा पर्याय स्वीकारला. भाजीपाला पिकविणाºया शेतीचे फूलांच्या शेतीत रूपांतरण करण्यात यश मिळविले आहे.देलनवाडी हे गाव शंकरपट तसेच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. कायदे बदलल्याने शंकरपट बंद झाला. देलनवाडी व पळसगावच्या सीमेवरून बोकडी नदी लहान असल्याने दोन्ही गावच्या शेतकºयांना पाण्याचा लाभ घेता येतो. वीजपंप व अथवा विहिरी नसतानाही बोकडी नदीचे पाणी शेतकरी नदीतच खड्डा करून अडवतात आणि मोटाच्या सहाय्याने भाजीपाला लागवडीसाठी वापरतात. धान पिकाबरोबरच भाजीपाल्याचेही उत्पादन घेतले जाते. गुरूवारी नवरगावात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे विक्रीचाही प्रश्न निर्माण होत नाही. देलनवाडी येथील गोड वांगे तालुक्यात आजही प्रसिद्ध आहे. मात्र, मोटेने पाणी ओढण्याची पद्धत हळूहळू बंद झाली. बºयाच शेतकºयांनी योजनेद्वारे विहिरी खोदल्या. हातपंपाची सुविधा निर्माण केली. पारंपरिक शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे पाहून शेतकºयांनी भाजीपाला लागवडीचे क्षेत्र कमी केले. भाजीपाला सोबतच आता इतरही पिके घेत असल्याने स्थिती सुधारत आहे.बोकडी नदी ठरली वरदानभाजीपालासोबत इतरही पिके घेतली जात आहेत. यातून अधिक उत्पादन होत आहे. देलनवाडी येथून पळसगाव मार्गाने गेल्यास रस्त्याच्या दुतर्फा आता विविध फुलांचे बगीचे बघायला मिळतात. यामध्ये डेजी सफेद, डेजी पिवळे, झेंडू, शेवंती अशा विविध जातीच्या फुलांचा समावेश आहे. बारमाही कामामुळे मजुरांनाही रोजगाराचा आधार मिळाला. शेतकºयांसाठी बोकडी नदी वरदान ठरली आहे.कृषी योजनांची गरजदेलनवाडी परिसरात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने अनेक शेतकºयांनी आधुनिक शेतीची कास धरली. परंतु, राज्य शासनाचे कृषी विभाग जिल्हा परिषदेच्या विविध योजना अद्याप पोहोचल्या नाही. शेतकºयांचा कल लक्षात घेऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास हा परिसर तालुक्यासोबतच जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरू शकतो.

टॅग्स :agricultureशेती