झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 05:00 IST2021-09-16T05:00:00+5:302021-09-16T05:00:02+5:30
सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहे. विशेषत: काही ठिकाणी ११ हजार रुपयांपर्यंत भाव गेले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र ऐन हंगामात पावसाचा फटका बसतो. शिवाय सोयाबीनचे तेल ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी लवकर व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची लागवड केली आहे. कमी कालावधीत येणारे सोयाबीन लवकरच शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे.

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कमी दिवसांत उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे या वर्षी लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. सोयाबीन लवकर हाती आल्यास भाववाढीचा लाभही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहे. विशेषत: काही ठिकाणी ११ हजार रुपयांपर्यंत भाव गेले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र ऐन हंगामात पावसाचा फटका बसतो. शिवाय सोयाबीनचे तेल ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी लवकर व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची लागवड केली आहे. कमी कालावधीत येणारे सोयाबीन लवकरच शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नुकसानीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
शेतकरी म्हणतात...
कमी कालावधीत येणारे सोयाबीन घेतल्यामुळे अनेक फायदा आहेत. परतीच्या पावसापासून नुकसान टाळले जाऊ शकते. तसेच बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या या सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांची पसंती आहे.
- चेतन बोबाटे, शेतकरी
काही वर्षांपासून पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. या वर्षी पीक चांगले आहे. कमी दिवसांत येणाऱ्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहे. काही दिवसांत मध्यम कालावधीतील सोयाबीन बाजारात येईल. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना फायदा होण्याची आशा आहे.
-भास्कर जुनगरी, शेतकरी
झटपट येणारे सोयाबीन
१०० ते १०५ दिवसांमध्ये येणारे सोयाबीनचे वाण विकसित झाले आहे. हे वाण झटपट येत असल्याने सोयाबीनच्या दरवाढीचा फायदा होत आहे.
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन
सोयाबीनचे मध्यम कालावधीत येणारे वाण १०५ ते १२० दिवसांमध्ये येते. या खरिपात मध्यम कालावधीतील सोयाबीन अद्याप बाजार समितीत येण्यास आणखी काही दिवस बाकी आहे.
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन
सोयाबीनच्या काही वाणांना जास्त कालावधी लागतो. या सोयाबीनला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या सोयाबीनला परतीच्या पावसाचा धोका असतो. तसेच रब्बी हंगामात पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवण्यासही विलंब होतो.