शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचा भूखंड धारकांवर अन्याय

By admin | Updated: October 9, 2016 01:28 IST

चंद्रपूर- मूल मार्गावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या इको पार्कच्या बाजुने नगर पालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता आहे.

रस्ता खुला करून देण्याची भूखंडधारकांची मागणीमूल : चंद्रपूर- मूल मार्गावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या इको पार्कच्या बाजुने नगर पालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता आहे. परंतु वनविभागाने रस्ता नसल्याचे सांगून रस्ता बंद केला आहे. यामुळे भविष्यात जवळच्या भूखंडातील नागरिकांना ये- जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.नगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार वनविभागाने रस्त्याची जागा सोडून इको पार्क तयार करावे, अशी मागणी भूखंड धारकांनी केली आहे. मूल शहरात दिवसेंदिवस भूखंड मिळणे कठीण झाले आहे. भूखंड घेण्यासाठी स्पर्धा होत असल्यामुळे भूखंडाचे दरही गगणाला भिडले आहे. यातच ज्यानी भूखंड घेवून घराचे बांधकाम केले, त्यांना रस्त्याच्या समस्येने ग्रासले आहे. चंद्रपूर- मूल मार्गावरील भूमापन क्रमांक १९० ते १९८ च्या भूखंड धारकांवरही वनविभाग अन्याय करीत आहे. मूल शहराच्या नगर विकास आराखड्यानुसार भुमापन क्रमांक १९० ते १९८ च्या भूखंड धारकांना भूमापन क्र. १८९ च्या बाजुने रस्ता दाखविलेला आहे. परंतु वनविभागाने रस्ता बंद करीत असल्यामुळे ये- जा करण्याचा प्रश्न भूखंडधारकांना निर्माण झालेला आहे.चंद्रपूर- मूल मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली भुमापन क्रमांक १८९ ही जमीन वनविभागाची आहे. सदर जागेवर वनविभागाने इको पार्कची निर्मिती करणार आहे, याच भूखंडाच्या मागील बाजुला भूमापन क्रमांक १९० ते १९८ च्या भूखंडधारक घराचे बांधकाम करून वास्तव्य करीत आहेत. त्यांना ये- जा करण्यासाठी नपच्या विकास आराखड्यात रस्ता असतानाही तो रस्ता बंद करीत असल्याने भविष्यात ये- जा करण्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे सदर रस्ता बंद करू नये, अशी मागणी भूखंक धारक राकेश ठाकरे, विलास आळे, आय.एफ. पुणेकर, सतीश येनप्रेड्डीवार, कपिल गुरुनुले, संतोष रेगुंडवार व इतर नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)इको पार्कचे काम सुरू करण्यापूर्वी डिएलआर सर्व्हेनुसार सदर क्षेत्राची मोजणी केलेली आहे. या मोजणीमध्ये १.४८ हे. क्षेत्र वनविभागाचे आहे. त्या सर्व्हेमध्ये कुठलाही प्रकारच्या रस्ताचा उल्लेख नाही. त्यामुळे वनविभाग अन्याय करीत असल्याचा प्रश्नच येत नाही.- एस. एल. बालपने,क्षेत्र सहायक, वनविभाग, मूल.