हरभरा पिकावर मर रोगाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 05:00 IST2021-12-24T05:00:00+5:302021-12-24T05:00:21+5:30
आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात होती.

हरभरा पिकावर मर रोगाची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : बोंडअळीमुळे कापूस पीक गेले. उभे तुरीचे पीक शेतातच वाळले आणि आता रब्बी हंगामात मररोगाचा प्रकोप आला. त्यामुळे शेतात उभे असलेले हरभऱ्याचे पीक फळधारणा होत असताना वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात पडला आहे. खरिपामध्ये लावलेले कपाशी पीक शेतकऱ्यांनी बोंडअळीमुळे शेतातून काढून टाकले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन कपाशीचे झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यातच हरभरा पिकाचे उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात होती.
परंतु आता मररोगामुळे पीक वाया जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कापूस, तूर या नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. कीटकनाशके औषधे, बियाणे यासाठी केलेला खर्चही भरून निघालेला नाही. यातच कापसाचे भाव जरी वाढलेले दिसत असले तरी उत्पादन मात्र कमी झाल्याने हरभरा पिकाच्या आशेवर असलेला शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे.
मररोगामुळे झाड लाल पडत असून, याचा परिणाम फळधारणेवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.