शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील रस्त्यांसाठी वाढीव निधीची तरतूद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:23 IST

कोरपना : तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना वर्षभर संकटांचा सामना ...

कोरपना : तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना वर्षभर संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करतानाच रस्त्यांसाठी वाढीव निधी देण्याची मागणी आदिवासींनी निवेदनातून केली आहे.

कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. उत्तरेकडील भारोसा, इरई, विरुर, अंतरगाव, पिपरी, कोडसी बुज व अकोला, पारडी, कोठोडा, परसोडा, दक्षिणेकडील थिप्पा, उमरहिरा, जाभुलधरा - टांगाळा- सावलहिरा, येरगव्हाण, पिपर्ड, चिंचोली, वडगाव, इंजापूर, बैलमपूर, मानोली, पूर्व भागातील उपरवाही, धुनकी, बाखर्डी, नवेगाव-वरोडा हे रस्ते अद्यापही थेट जुळली नाही. बाखर्डी, नांदा, कढोली, नारंडा, जेवरा, गांधीनगर, कान्हाळगाव, कोरपना, कुसळ, पिपर्ड, नारंडा, लोणी, शेरज, कोडसी गावे अजुनही एकमेकांशी जुळू शकले नाही. सावालहिरा, येल्लापूर, बोरगाव, सिंगार पठार, शिवापूर आदी राज्य सीमा मार्ग रखडला आहे. कागदावर प्रस्तावित आराखडा तयार असला तरी कामाला सुरुवात झाली नाही. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष तातडीने दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.