कारागृहातील आरोपींच्या मुक्कामात वाढ
By Admin | Updated: February 13, 2015 01:27 IST2015-02-13T01:27:29+5:302015-02-13T01:27:29+5:30
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रात कक्ष क्र. ४९० या राखीव वनात रात्री बेकायदेशीर बंदुकीसह प्रवेश करून सांबराची शिकार करणाऱ्या चार आरोपीना ...

कारागृहातील आरोपींच्या मुक्कामात वाढ
कोठारी : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रात कक्ष क्र. ४९० या राखीव वनात रात्री बेकायदेशीर बंदुकीसह प्रवेश करून सांबराची शिकार करणाऱ्या चार आरोपीना गुरूवारी बल्लारपूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी भीमसिंग टांक रा. जुनोना चौक चंद्रपूर हा फरार असून त्याचा वन विभाग कसून शोध घेत आहे.
८ फेब्रुवारीला संतोषसिंग टांक, रमेश गेडाम, यशवंत गेडाम, रमेश कुर्तावार व भीमसिंग टांक सर्व रा. भिवापूर, बाबुपेठ हे भरभार बंदुक, सर्च लाईट, कुऱ्हाड आदी साहित्यासह रात्री बल्लारपूर वनक्षेत्रातील कक्ष क्र. ४९० मध्ये शिकारीसाठी गेले. याची माहिती वनाधिकारी दिलीप वडेट्टीवार यांना मिळाली. त्यांनी रामनगर पोलिसांसह सापळा रचला.
रात्री वाजताच्या सुमारास शिकार झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपींना जेरबंद केले. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात ८ ते १० फेब्रुवारी व ११ ते १२ फेब्रुवारी वनकोठडी सुनावण्यात आली. आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर चौघांनाही पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)