शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीच्या दर्जानंतरही नगरवासीयांची गैरसोय

By admin | Updated: October 7, 2016 01:05 IST

स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले

गोंडपिपरी : स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांचा आजवर आठ महिन्याचा कालावधी लोटूनही शहरातील अनेक प्रभागांमध्ये समस्या ‘जैसे थे’च आहेत. नगरपंचायतीचा दर्जा प्राप्तीनंतरही नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आता ऐकावयास मिळत आहे.पावसाळा ऋतूपूर्वीच येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र काही अवधीतच सफाई कामगारांना बंद करुन तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील अर्धवट सफाई थांबविली. त्यानंतर स्थानिक मानधन तत्वावरील सफाई कामगारांना प्रत्येक प्रभागात सफाईचे काम करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु कमी कामगार असल्याने व नगरसेवकांचे दबावतंत्र यात काही प्रभागात आजवर नाल्यांची सफाईच करण्यात आली नाही. यानंतर पावसाळा ऋतूत प्रभागांच्या अंतर्गत मार्गावर मुरुम टाकण्यासाठीदेखील नगर पंचायतीने आगेकूच केली. पण नगरसेवकांच्या वारंवार हस्तक्षेपाने व दबावतंत्रामुळे कुठे मुरुम पडला तर कुठे मुरुमाची प्रतीक्षाच नगरवासीयांना करावी लागली.शहराच्या प्रत्येक प्रभागात कच्चे रस्ते असल्याने हे रस्ते आता खड्डेमय झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून पाण्यातून दुर्गंधी येत असते. या प्रकारामुळे बालगोपालांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. अनेक प्रभागाच्या रस्त्यांवरुन पादचारी लोकांनाही धड चालता येत नाही. या होणाऱ्या गैरसोयीबाबत येथील नगरपंचायतीचे युवा पदाधिकारी व मुख्याधिकारी लक्ष देणार काय, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)