शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती उपशाने महसुलावर पाणी

By admin | Updated: June 8, 2015 01:46 IST

तालुक्यातील सहापैकी काही रेती घाटाचे आणि घराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचा लिलाव झाला नाही.

सावली तालुका : अनेक घाटांचा लिलावच नाहीसावली: तालुक्यातील सहापैकी काही रेती घाटाचे आणि घराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचा लिलाव झाला नाही. मात्र या घाटांवरून सर्रास वाळू उपसा होत असल्याने शासनाचा सुमारे दोन कोटी रुपयापेक्षा जास्त महसूलावर पाणी फेरल्या जात असल्याचा अंदाज आहे. सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम सुरु आहे. प्रत्येक गावात घरकुलांसोबतच सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकामही केले जात आहे. घरांच्या पायाभरणीसाठी आणि सिमेंट रस्ते व नाली बांधकामासाठी नाल्यातील जाड रेती अवैधरित्या राजरोसपणे उपसणे सुरू आहे. तालुक्यात अंदाजे पाचशे ट्रॅक्टर आहेत. त्यापैकी दोनशे ते तीनशे ट्रॅक्टर पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत जाड रेतीच्या दोन फेऱ्या मारत असतात. एका फेरीचा शासकीय परवाना महसूल २०० रुपये आहे. त्यानुसार आॅक्टोबर ते जून या नऊ महिन्याच्या कालावधीत कोट्यवधी रुपयाचा महसूल स्थानिक प्रशासन स्वत:हून बुडवत असल्याचे बोलले जात आहे.२५० ट्रॅक्टरचे एका दिवसातील एका फेरीचे २०० रुपये प्रमाणे (शासकीय दर) ५० हजार रुपये, तर एका महिन्याचे १५ लक्ष रुपये याप्रमाणे नऊ महिन्यात १ कोटी ३५ लक्ष रुपये होतो. आॅक्टोबर ते जून या नऊ महिन्याच्या कालावधीत प्रत्येक ट्रॅक्टर साधारणत: दोन फेऱ्या मारत असते. त्यानुसार शासनाला एकाच तालुक्यातून दोन कोटी ७० लक्ष रुपयाचा चुना लावण्याचा गोरखधंदा ट्रॅक्टर चालकांकडून सुरू आहे. यात महसूल प्रशासनाचाही हातभार लागत असल्याने ‘तुम्ही खा आणि आम्हालाही खाऊ द्या’ असा छुपा करारच झाल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून जाड रेती घाटांचा लिलाव होत नसल्याने प्रशासनासोबतच ट्रॅक्टर मालकांचेही फावत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाकडे काही उपाययोजना नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)